शिक्षण आणि ‘करिअर’ दोन वेगवेगळ्या गोष्टी - निशीगंधा बावधनकर-तायडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 07:50 PM2019-10-26T19:50:56+5:302019-10-26T19:51:34+5:30
प्रसिध्द सौदर्यं विशेषज्ञ निशीगंधा बावधनकर- तायडे यांच्याी साधलेला संवाद...
-अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक वळणं येतात. मात्र, हीच वळणं मनुष्याला अधिक प्रगल्भ आणि समृध्द करतात. प्रत्येक संघर्षाशी सामना करत, जीवनाला सामोरं गेलं तरच जीवन सफल होते. प्रसिध्द सौदर्यं विशेषज्ञ निशीगंधा बावधनकर- तायडे यांच्याी साधलेला संवाद...
शिक्षण आणि कारकीर्द या बद्दल काय सांगाल?
जिद्द, सचोटी आणि परिश्रमाच्या जोरावर एखादी निरक्षर अथवा कमी शिक्षलेली व्यक्ती आयुष्यात यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. अनेक व्यक्ती आयुष्यात येणारे अनुभव आणि प्रवासातून बरंच काही शिकून जातात. त्यामुळे शिक्षणाचा आणि कारकीर्दीचा फारसा संबध आहे, असे मानने चुकीचे ठरेल? असे आपले प्रामाणिक मत आहे.
वकीली क्षेत्र सोडण्या मागचे कारण काय?
शिक्षणानंतर पुणे येथे वकीलीची कारकीर्द सुरू केली. मात्र, वकीलीपेक्षा सौदर्य आणि कलाक्षेत्रातच सुरूवातीपासून आपणाला आवड होती. त्यामुळे वकीलीचे शिक्षण घेतले असले तरी, आवडीच्या क्षेत्रात कारकीर्द करण्याचे ठरविले. रूची म्हणून सौदर्य क्षेत्रात उतरले. रूची हीच आपल्या सौदर्य क्षेत्रातील कारकीर्दीला महत्वाचे वळण ठरली. वकीली क्षेत्रात मनापासून मेहनत घेतली असती तर कदाचित या क्षेत्रातही नावलौकीक मिळविता आला असता. मात्र, नियतीला काही औरच मान्य होतं.
सौंदर्यक्षेत्रात आपली उपलब्धी काय?
सौंदर्यक्षेत्राला ‘करिअर’ म्हणून निवडल्यानंतर जय मल्हार मालिकेतील नायिका इशा केसकर यांचे मेकअप करण्याची संधी मिळाली. त्यानंतर चित्रपट, नाट्य आणि टिव्ही मालिका क्षेत्रातील नवोदीत तसेच इतर नवोदीत कलावंताच्या सौदर्याची काळजी घेण्याचे भाग्य लाभले.
प्रत्येकाच्या मनात सौदर्य दडलेलं असतं. सौदर्य हे त्वचेच्या पलीकडे असते. तरी पण आपली त्वचा आपले सौदर्य अभिव्यक्त करते. साधी केशरचना जरी चांगली नसली तरी अनेक जण दु:खी होतात. त्यांच्या चेहºयावर हास्य फुलविण्यासाठी, सौंदर्य खुलविण्यासाठी आपले सौंदर्याच्या क्षेत्राला प्राधान्य राहणार आहे.
सौदर्य क्षेत्राकडं कशा वळलात ?
वकीलीच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि सौंदर्य चिकीत्सेच्या दुनियेत येऊन लोकांना सुंदर करण्याच्या कलेत प्राविण्य मिळविले. आता या क्षेत्रातच आपणाला मनस्वी आनंद मिळत आहे. दुसºयांच्या सौदर्याची काळजी घेणं ही एक कला म्हणून समोर येत आहे. या क्षेत्रातही युवकांना करीअर करण्याची संधी आहे. पारिवारीक सदस्य, नातेवाईक तसेच मैत्रिणींचे ‘मेकअप’ करून देत असतानाच, सौंदर्य विषयक कला अंगी असल्याचे समजले. त्यानंतर वकीलीक्षेत्राचा त्याग करून सौंदर्यक्षेत्राला महत्व दिले. या क्षेत्रात चांगली संधी मिळत आहे. युवकांनीही या क्षेत्राकडे वळावे, असे आपलं आवाहन आहे.