वाढत्या चोऱ्या लक्षात घेता, गस्तीसाठी स्वखर्चातून दिले दोन सुरक्षारक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:43 AM2021-09-16T04:43:13+5:302021-09-16T04:43:13+5:30
चोऱ्या होऊ नये, यासाठी मलकापूर पांग्रा येथील पोलीस मदत केंद्रात गावातील प्रतिष्ठाने दुकानदार सोबत सल्लामसलत करून त्यांची बैठक बोलून ...
चोऱ्या होऊ नये, यासाठी मलकापूर पांग्रा येथील पोलीस मदत केंद्रात गावातील प्रतिष्ठाने दुकानदार सोबत सल्लामसलत करून त्यांची बैठक बोलून चर्चा करत, गावातील रात्रीची गस्त घालण्यासाठी पुरेसे पोलीस कर्मचारी नसल्याने पोलीस नेमता येणे शक्य नसल्याने, ठाणेदार यांनी आपल्या स्वखर्चाने गावाच्या गस्तीसाठी गावातीलच दोन सुरक्षारक्षक तयार करून, त्यांना दर आठवड्याला प्रत्येकी हजार म्हणजे दोघांना दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. उपस्थित सर्व व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी ठरावीक रक्कम या गस्त घालणाऱ्यांना द्यावी, तसेच ठाणेदार यांनी या सुरक्षारक्षकांना दंडे आणि शिट्ट्या दिल्या आहेत. व्यापारी दुकानदार यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून, रात्रीच्या वेळी गस्तीचे फोटोही दररोज पाठविले जाणार आहेत, तसेच यावेळी ठाणेदार यांनी ग्रामपंचायतीमार्फत गावातील चौकांवर सीसीटीव्ही लावण्यात यावी, जेणेकरून अशा होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालता येईल, असे सांगितले. यावेळी सरपंच यांनीही ठाणेदार यांच्या शब्दांना दुजोरा दिला. सभेला तंटामुक्ती अध्यक्ष मोहम्मद यार खान, सरपंच भगवानराव उगले, नंदकिशोर दळवी, किशोर मिसाळ, प्रवीण मिसाळ, बशीर खान, नदीम हुसेन, सिद्दिकी, ठाणेदार जितेंद्र आडोळे, पोलीस उपनिरीक्षक अतहर शेख, बीट जमदार नारायण गीतेसह गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा व्यापारी वर्ग उपस्थित होते.