शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:23 AM2021-07-21T04:23:42+5:302021-07-21T04:23:42+5:30
आदर्श ग्राम याेजनेत सवडदचा समावेश सिंदखेड राजा : तालुक्यातील सवडद येथे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती, पुणे यांच्या ...
आदर्श ग्राम याेजनेत सवडदचा समावेश
सिंदखेड राजा : तालुक्यातील सवडद येथे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती, पुणे यांच्या तांत्रिक चमूने गावात भेट देऊन गाव फेरी व शिवार फेरी करून, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजना राबविण्यासाठी गावाची निवड केल्याची घोषणा केली.
नगरपंचायतचे कामकाज खाेळंबले
माेताळा : येथील नगरपंचायतमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नगरपंचायतचे कामकाज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बळावर सुरू आहे. काही कंत्राटी कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
सिमेंटचे दर वाढले, सर्वसामान्यांना फटका
देऊळगाव मही : सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रतिबॅग जवळपास ३० टक्के वाढ केल्यामुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. दरम्यान, ही दरवाढ मागे घेण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांमधून होत आहे.
संत रविदास नगरात सोईसुविधा द्या!
चिखली : शहरातील संत रविदास नगरातील शेत सर्व्हे ९८ मधील आरक्षण क्र. ७२ व १७ या जागेवरील आरक्षण वगळून या नगरातील रहिवाशांना घरकूल, रस्ते, नाले आदी सोईसुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी छोटू कांबळे यांनी एका निवेदनाद्वारे आ.श्वेता महाले यांच्याकडे केली आहे.
डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया ही नियंत्रणात!
बुलडाणा : पावसाळ्यात दरवर्षी साथीचे आजार डोके वर काढतात. सध्या कोरोनाचे रुग्ण काहीसे कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. काेराेनाची लाट ओसरली असली, तरी पावसाळ्यातील आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
पारडा दराडे परिसरात वन्यप्राण्यांचा हैदाेस
देऊळगाव कुंडपाळ : येथून जवळच असलेल्या पारडा दराडे परिसरात गत काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा हैदाेस सुरू आहे़. राेहिच्या कळपाने एका शेतकऱ्याच्या शेतातील भाजीपाला पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान केले.