घरकुलांचे बांधकाम रखडले
By admin | Published: April 24, 2015 12:59 AM2015-04-24T00:59:03+5:302015-04-24T00:59:03+5:30
इंदिरा व रमाई आवास योजनेतर्गत खामगावातील घरकुल बांधकामाला गती मिळेना.
नाना हिवराळे /खामगाव (जि. बुलडाणा): तालुक्यात गत ७ ते ८ महिन्यांपासून सुरु असलेल्या घरकुलाचे बांधकाम अध्र्यावर येवून थांबले आहेत. एकीकडे घरकुलाचा निधी वेळेवर मिळत नाही तर दुसरीकडे बांधकाम पूर्ण करून दाखवायला लाभा र्थ्यांंकडे पर्यायी व्यवस्था नाही. परिणामी, १४१६ घरकुलाचे बांधकाम अद्यापही रखडले आहे. घरकुल बांधकामाला गती मिळण्याची गरज आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी राज्य शासनाने रमाई घरकुल योजना सुरु केली. या योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील बेघर कुटुंबांना प्रतीक्षा यादीप्रमाणे प्राधान्य देण्यात आले आहे. खामगाव तालुक्यात सन २0१४-१५ या आर्थिक वर्षात १0२४ घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असता, यामधील सर्व घरकुलांना मंजुरात मिळाली. खामगाव तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीमधील १३५ गावात रमाई घरकुल योजनेसोबतच २0१४-१५ करिता इंदिरा आवासच्या ६२४ घरकुलांचे उद्दिष्टे मिळाले असता त्यामधील ५९0 घरकुलांना मंजुरात मिळाली. तर अपात्र लाभार्थी अद्यापही प्रतीक्षेत आहेत.