एका महिन्यातच शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 12:27 AM2017-09-09T00:27:52+5:302017-09-09T00:28:03+5:30

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनच्या कामास वेग येण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी सरसावले आहेत. मोताळा तालुक्यातील लिहा बु. या गावाच्या सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन आपले गाव हगणदरीमुक्तीच्या वाटेवर नेले आहे. ऑगस्टमध्ये या गावाने शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या बेसलाइन सर्व्हेप्रमाणे ४१९ कुटुंबांचे हे मोठे गाव असतानाही गावातील सकारात्मक विचारांच्या लोकांची एक मोट बांधून काम करीत आहेत. 

Construction of hundred toilets completed in one month | एका महिन्यातच शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण

एका महिन्यातच शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण

Next
ठळक मुद्देसरपंच पाटील यांच्या प्रयत्नातून लिहा बु. हगणदरीमुक्तीच्या वाटेवर! इतर गावांनी आदर्श घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनच्या कामास वेग येण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी सरसावले आहेत. मोताळा तालुक्यातील लिहा बु. या गावाच्या सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन आपले गाव हगणदरीमुक्तीच्या वाटेवर नेले आहे. ऑगस्टमध्ये या गावाने शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या बेसलाइन सर्व्हेप्रमाणे ४१९ कुटुंबांचे हे मोठे गाव असतानाही गावातील सकारात्मक विचारांच्या लोकांची एक मोट बांधून काम करीत आहेत. 
 अजूनही लोकांना शौचालयाचे महत्त्व पटवून सांगावे लागते, ही शोकांतिकाच आहे; परंतु सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील यांच्यासारख्या पदाधिकार्‍यांनी ठरवल्यास  हे काम अशक्य नाही. स्वच्छता हा ग्रामविकासाचा कणा आहे, हे ओळखून सरपंचांनी यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. त्यामध्ये लाभार्थींच्या गृहभेटी घेणे, बैठका घेणे,  तसेच गावातील सकारात्मक विचारांच्या लोकांना एकत्र करून या कामास गती देत आहेत. ४१९ कुटुंबांचे  हे मोठे गाव आहे. अद्याप २५४ एवढे शौचालये त्यांनी पूर्ण केले असून, ऑगस्टमध्ये शंभर या विक्रमी संख्येने त्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून घेतले. अजून त्यांच्याकडे १५४  शौचालये बांधकाम बाकी असून, येत्या महिनाभरात ते पूर्ण करण्याचे नियोजन त्यांनी केलेले आहे. यासाठी त्यांना ग्रामसेवक शीतल गवळी यांचे विशेष सहकार्य लाभत असून, ईश्‍वर पाटील, अनिल हरगड, गजानन सपकाळ, यांचाही सक्रिय  सहभाग लाभत आहे. तसेच गावाच्या तलाठी मंदा राठोड यांचाही मोलाचा सहभाग लाभत आहे. इतर सरपंचांनीही यांचा आदर्श घ्यावा, असे आदर्शवत सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील या स्वच्छ भारत मिशनसाठी काम करीत आहेत. लवकरच त्या गाव हगणदरीमुक्त करून एक आदर्श निर्माण करतील, याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

इतर गावांनी आदर्श घेण्याची गरज
मोताळा तालुक्यातील लिहा बु. येथील ग्रामस्थांनी एका महिन्यात शंभर शौचालयांचे बांधकाम करण्याचा विक्रम केल्यामुळे परिसरात हगणदरीमुक्त गावाची चळवळ वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लिहा बु. गावाचे सर्वत्र कौतुक होत असून, जिल्ह्यातील इतर गावांनी या गावाचा आदर्श घेऊन आपले गाव हगणदरीमुक्त करून आदर्श गाव निर्माण करण्याचा चळवळीत भाग घेण्याची गरज आहे.

Web Title: Construction of hundred toilets completed in one month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.