अमडापुरात सरपंच निवडणुकीसाठी माेर्चे बांधणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:37 AM2021-02-09T04:37:34+5:302021-02-09T04:37:34+5:30
अमडापूर ग्रामपंचायतच्या १७ पैकी १३ जागा ग्रामविकास परिवर्तन पॅनलले जिंकल्या आहेत. माेठी ग्रामपंचायत असल्याने सरपंचपदासाठी प्रत्येक निवडणुकीसाठी चुरस राहत ...
अमडापूर ग्रामपंचायतच्या १७ पैकी १३ जागा ग्रामविकास परिवर्तन पॅनलले जिंकल्या आहेत. माेठी ग्रामपंचायत असल्याने सरपंचपदासाठी प्रत्येक निवडणुकीसाठी चुरस राहत हाेती. मात्र, यावेळभ सरपंचपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असल्याने यावेळी प्रथमच ग्रामपंचायत सदस्यांच्या सहलीला खंड पडला आहे. अमडापूरच्या सरपंच व उपसरपंच निवडणूक तारखेपर्यंत सहलीवर जाण्याची जणू काही पद्धतच पडली होती. मात्र यावर्षी निवडणूक तारीखजवळ आली असून, सर्व नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य हे गावातच दिसून येत आहे.
सहलवारी करण्यासाठी अनेक सदस्य उत्सुक असतात. अनेक वेळा दाेन्ही पॅनलचे समान सदस्य निवडणूक आल्यानंतर खरी रंगत रहायची. आपल्या मताने सरपंच निवडून येईल, अशी भावना प्रत्येक सदस्याला असायची. मात्र, यावर्षी परिवर्तन पॅनलने एकतर्फी बहुमत मिळवले आहे. तसेच सरपंचपदही अनुसूचित जामीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. या प्रवर्गाची एकच सदस्य निवडून आल्याने चुरस कमी झाली आहे. आता उपसरपंच काेण हाेताे, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.