सवणा, इसोलीत विलगीकरण कक्षाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:33 AM2021-05-24T04:33:33+5:302021-05-24T04:33:33+5:30

चिखली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागातील प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष उभारण्याची गरज आहे. जेणेकरून कोरोना रुग्णांना गावातच ...

Construction of Separation Room at Savana, Isoli | सवणा, इसोलीत विलगीकरण कक्षाची निर्मिती

सवणा, इसोलीत विलगीकरण कक्षाची निर्मिती

googlenewsNext

चिखली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागातील प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष उभारण्याची गरज आहे. जेणेकरून कोरोना रुग्णांना गावातच आयसोलेट करून रुग्णांच्या कुटुंबीयांना संसर्ग होण्यापासून रोखता येणार आहे. याचा एकत्रित परिणाम होऊन गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होतील, असा आशावाद आमदार श्वेता महाले पाटील यांनी तालुक्यातील सवणा व इसोली येथील विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

ग्रामीण भागातील कोरोनाबाधित व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गावातच विलगीकरणात ठेवून संसर्ग रोखण्यासाठी तालुक्यातील सवणा व इसोली येथे विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या कक्षाचे उद्घाटन आ. महालेंच्या हस्ते पार पडले. सवणा येथे पं.स. सभापती सिंधू तायडे, जि.प. सदस्य शरद हाडे, पं.स. उपसभापती शमशाद पटेल, नासेर सौदागर, भाजप तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, प्रा. वीरेंद्र वानखेडे, किशोर जामदार, सरपंच सुनील शेळके, भारत शेळके, विनोद सीताफळे, सरपंच सत्यभामा सुरडकर, जाधव, हिवाळे, विद्या देव्हडे, उपसरपंच, अनुरथ भुतेकर, कय्युम शाह, विठ्ठल देव्हडे, रवी शिरसाट, सतीश नवले, संगीता हाडे, कल्पना हाडे, मालता एखंडे, पार्वती सोलाट, ऊर्मीला थोरात, तर इसोली येथे किसन कोकाटे, शंकर रायकर, भारत शेळके, बाळू शेळके, सरपंच सुनील शेळके, उपसरपंच प्रकाश लांघे, गोविंद येवले, शेख युनूस, ग्रा.पं. सदस्य माणिकराव खरात, समाधान धनलोभे, डॉ. शेख रईस, श्याम शेळके, मंदा दिघे, पूनम भागवत, आरोग्य सेविका सुनीता आटोळे, विजय येवले, मारुती लोंढे, सचिन जाधव, संतोष भागवत, शेख हारून, ग्रामसेवक पवार, तसेच ग्रा.पं. कर्मचारी व जि.प. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Construction of Separation Room at Savana, Isoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.