ज्ञानगंगेच्या पूराने तुटला पाच गावांचा संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 03:14 PM2019-11-04T15:14:36+5:302019-11-04T15:14:44+5:30

पोरज गेरु-माटरगांव श्रीधर नगर सारोळा व दिवठाणा या गावांचा पूर स्थितीमुळे संपर्क तुटला आहे.

Contact of five villages broken by the floods of Dnyanganga | ज्ञानगंगेच्या पूराने तुटला पाच गावांचा संपर्क

ज्ञानगंगेच्या पूराने तुटला पाच गावांचा संपर्क

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
पोरज : दोन दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसाने ज्ञानगंगा नदीलापूर आला आहे. यामुळे खामगाव तालुक्यातील पाच गावांचा संपर्क तुटला आहे. महिनाभरात निम्न ज्ञानगंगा प्रकल्प २, निमकवळा ओहरफ्लो फ्लो झाला आहे. पोरज गेरु-माटरगांव श्रीधर नगर सारोळा व दिवठाणा या गावांचा पूर स्थितीमुळे संपर्क तुटला आहे. आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्यासह तहसिलदार शीतलकुमार रसाळ यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. निम्न ज्ञानगंगा प्रकल्प २ व निमकवळा प्रकल्प ओहरफ्लो फ्लो झाल्याने पोरज ज्ञानगंगा पाणलोट क्षेत्रात शेतकऱ्यांसह अनेक गावात नुकसान झाले आहे. पोरज गेरु-माटरगांव श्रीधर नगर सारोळा व दिवठाणा या गावांचा पूर स्थितीमुळे संपर्क तुटला आहे. दिवठाण्यातील घरांमध्ये ज्ञानगंगा प्रकल्पातील सांडव्याचे गावात पाणी घुसल्याने गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली. गत महिन्याभरापूर्वी सुद्धा ज्ञानगंगा प्रकल्प ओवरफ्लो झाला होता.
प्रशासनाच्यावतीने ग्रामस्थांची समजूत काढून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप मदत मिळाली नाही. स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी पाटबंधारे विभागाला दीड वर्षापूर्वीच सूचना दिल्या होत्या की दिवठाणा गावाचे पुनर्वसन लवकरात लवकर करण्यात यावे मात्र पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे गावाचे पुनर्वसन अपुरेच राहिले आहे असा आरोपही गावकरी करीत आहेत. पुरामुळे पूल पाण्याखाली गेला आहे. दिवठाणा गावातील सर्वच घरात सांडव्याचे पाणी घुसले आहे. ज्ञानगंगा प्रकल्पासाठी दिवठाणा या गावाचे काळेगाव फाट्या नजीक पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र शासनाकडून जागेचा मोबदला आणि पुनर्वसनासाठी असलेल्या सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत.

Web Title: Contact of five villages broken by the floods of Dnyanganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.