महावितरणकडून रोहित्र बदलण्याचे काम सुरू

By Admin | Published: September 28, 2015 02:36 AM2015-09-28T02:36:48+5:302015-09-28T02:36:48+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील नादुरुस्त रोहित्र बदलण्याची कामे करण्यासाठी स्वतंत्रपणे एजन्सीची नेमणूक.

Continuing the work of transforming electricity from Mahavitaran | महावितरणकडून रोहित्र बदलण्याचे काम सुरू

महावितरणकडून रोहित्र बदलण्याचे काम सुरू

googlenewsNext

बुलडाणा : जिल्ह्यातील नादुरुस्त रोहित्र बदलण्याची कामे करण्यासाठी स्वतंत्रपणे एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून, ही कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली. ह्यधाड उपविभागात ६३0 रोहित्रे नादुरुस्तह्ण असे वृत्त 'लोकमत'मध्ये शनिवारी प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, धाड उपविभागात ४५ गावांमध्ये ६५0 कृषिपंपांना रोहित्राद्वारे विद्युत पुरवठा केला जातो. सप्टेंबरमध्ये नादुरुस्त झालेल्या व बदलणे बाकी असलेल्या रोहित्रांची संख्या सात असून, ते लवकरच बदलविण्यात येणार आहेत. याशिवाय ज्या रोहित्रामध्ये ऑइल कमी आहे, त्यामध्ये ऑइल टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच ही कामे पूर्ण करण्यात येत आहेत. शेतकर्‍यांना येत्या खरीप हंगामामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी महावितरण कंपनीची कामे युद्घपातळीवर सुरू आहे, असेही म्हटले आहे.

Web Title: Continuing the work of transforming electricity from Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.