हक्कासाठी परिचारिकांचा अविरत लढा

By Admin | Published: May 11, 2015 11:59 PM2015-05-11T23:59:46+5:302015-05-12T00:10:02+5:30

परिचारिका दिन विशेष; बुलडाणा जिल्ह्यात साडेतीन हजार परिचारिका कार्यरत.

Continuous fight for the rights | हक्कासाठी परिचारिकांचा अविरत लढा

हक्कासाठी परिचारिकांचा अविरत लढा

googlenewsNext

बुलडाणा : रुग्णसेवेशी निगडित असलेल्या वैद्यकीय क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात बदत होत आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेताना रुग्णांना डॉक्टरसह रुग्णालयाती परिचारिकांचा ही आधार वाटतो तेवढाच आधार वाटत असतो. आज आरोग्य सेवेत आधुनिक बदल होत असतांनाही जिल्ह्यातील साडेतीन हजार परिचारिकांचा मात्र आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागत आहे. आज बहुतेक सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा जिल्ह्यात उपलब्ध आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, फिरते दवाखाने तसेच क्षयरोगी व कुष्ठरोगी, प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. शिवाय रुग्णांसाठी विशेष योजना आखण्यात आल्या आहेत. एक आव्हानात्मक क्षेत्र म्हणून जिल्ह्यातील बरेच तरुणतरुणी आज नर्सिगच्या क्षेत्रात विविध शासकीय व खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. बदलत्या आरोग्य व्यवस्थेबरोबर मात्र या परिचारिकांच्या विविध समस्य व मागण्या आजही कायम आहे. त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहचल्याच नाही.

Web Title: Continuous fight for the rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.