सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू

By Admin | Published: August 21, 2015 11:33 PM2015-08-21T23:33:18+5:302015-08-21T23:33:18+5:30

मलकापूर तालुक्यातील निवडणुका दोन टप्प्यात

Continuous frontline for sarpanch | सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू

सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू

googlenewsNext

मलकापूर (जि. बुलडाणा): मलकापूर तालुक्यातील पार पडलेल्या ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नंतर आता सरपंच व उपसरपंचपदाची निवड येत्या ३१ ऑगस्ट व ९ सप्टेंबर अशा दोन टप्प्यात होणार आहे. त्यामध्ये ३१ ऑगस्ट रोजी १४ तर ९ सप्टेंबर रोजी १९ ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचपदाची निवड होणार आहे. यामध्ये ३१ ऑगस्ट रोजी धरणगाव, कुंड बु., दाताळा, वरखेड, भाडगणी, पिंपळखुटा, दुधलगाव बु., वडजी, म्हैसवाडी, तांदुलवाडी, तालसवाडा, वाघोळा, भालेगाव तर ९ सप्टेंबर रोजी नरवेल, दसरखेड, विवरा, तिघ्रा, चिखली (रणथम), भानगुरा, दुधलगाव खुर्द, शिराढोण, लासुरा, लोणवडी, जांभुळधाबा, हरणखेड, खामखेड, माकनेर, वडोदा, हिंगणाकाझी, कुंड खुर्द, निंबारी, घिर्णी येथील सरपंचाची निवड करण्यात येणार आहे. सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीकरीता इच्छूकांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली असून बर्‍याच ग्रामपंचायतींमध्ये पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने त्यांचे सरपंचपद हे निश्‍चित समजल्या जात आहे. तर काही ठिकाणी अटीतटीची परिस्थिती असल्याने नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांना फोडण्याचे प्रयत्नही केल्या जातील.

Web Title: Continuous frontline for sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.