बुलडाणा शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:18 AM2020-06-30T10:18:22+5:302020-06-30T10:18:48+5:30

सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून बुलडाणा शहरासह परिसरात पावसाला सुरूवात झाली.

Continuous rains in the district including Buldana city | बुलडाणा शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस

बुलडाणा शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शहरासह परिसरात २९ जून रोजी सकाळी संततधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात २९ जून रोजी सकाळपर्यंत गेल्या चौविस तासामध्ये ८.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यात सर्वाधिक ३०.७ मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर पेरणी केल्यानंतर पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे अनेक शेतकºयांवर दुबार पेरणी करावी लागली. सध्या काही भागात दमदार पावसाची प्रतीक्ष आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून बुलडाणा शहरासह परिसरात पावसाला सुरूवात झाली. साडेदहा वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. या पावसाने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. सुकलेल्या पिकांनाही संजीवनी मिळाली असल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पाऊस उघडल्यानंतर दिवसरभर हवामान कोरडे होते. बुलडाण्यासह इतर तालुक्यातही रात्रीदरम्यान पावसाने हजेरी लावली. २८ जून ते २९ जून सकाळी आठ वाजेपर्यंत ८.३ मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला आहे. सिंदखेड राजा तालुक्यात सर्वात जास्त ३०.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. जळगाव जामोद तालुक्यात पाऊस झालाच नाही. बुलडाणा तालुक्यात झालेल्या दमदार पावसाने पिकांना जीवनदान मिळाले आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत होते. गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. तसेच अनेक शेतकºयांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याचे चित्र आहे. या पावसामुळे शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.


तालुकानिहाय पाऊस
जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८.३ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात ०.४ मि.मी., चिखली २.३ मि.मी., देऊळगाव राजा २१.४ मि.मी., सिंदखेड राजा ३०.७ मि.मी., लोणार ३० मि.मी., मेहकर १०.८ मि.मी., खामगाव ६.५ मि.मी., शेगाव १ मि.मी., नांदूरा ०.७ मि.मी., मोताळा १.४ मि.मी., संग्रामपूर ३ मि.मी. पाऊस झाला आहे.

Web Title: Continuous rains in the district including Buldana city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.