कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचाच इन्शुरन्स नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:29 AM2021-05-03T04:29:14+5:302021-05-03T04:29:14+5:30
या सर्व पार्श्वभूमीवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना विम्याचा लाभ दिला जावा, अशी मागणी जोर धरत आहेत. आधी फ्रंटलाइन वर्कर्सचा इन्शुरन्सचा हप्ता ...
या सर्व पार्श्वभूमीवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना विम्याचा लाभ दिला जावा, अशी मागणी जोर धरत आहेत. आधी फ्रंटलाइन वर्कर्सचा इन्शुरन्सचा हप्ता केंद्र सरकार भरत होते. गेल्या दोन महिन्यांपासून तोही बंद करण्यात आला आहे. त्यातच आता कंत्राटी कर्मचाऱ्यांचा हा विम्याचा मुद्दा समोर आला आहे. गेल्या वेळी कोविडचा संसर्ग कमी झाल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने कमी करण्यात आले होते. त्यावेळीही या कर्मचाऱ्यांनी सेवेत सामावून घेण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते. एनआएचमध्ये या कर्मचाऱ्यांना समाविष्ट केले जावे, अशी पूर्वीपासूनची या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनाही मधल्या काळात या कर्मचाऱ्यांनी निवेदन देऊन मागणी रेटली होती.
दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेण्यात आले आहे. मात्र त्यांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत, असे नीलेश इंगळे, दयानंद गवई व सहकाऱ्यांनी सांगितले.
--ऑर्डरची शाश्वती नाही--
कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रारंभी तीन महिन्यांची ऑर्डर दिली होती. त्यानंतर त्यांच्याकडून पुन्हा कागदपत्रे घेऊन ऑर्डर नवीन केल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात ऑर्डर मिळत नसल्याचे या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे किमान ११ महिन्यांची तरी ऑर्डर द्यावी, अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
--१२७ जण पॉझिटिव्ह--
कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी १२७ जण आतापर्यंत कोरोनाबाधित झाले असून, उपचारानंतर ते बरेही झाले आहेत. मात्र आजारपणामुळे एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा मध्यंतरी मृत्यू झाला आहे. रुग्णालयात त्यावर जवळपास २० दिवस उपचार करण्यात आले होते, असे कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेचे शेख जहीर शेख शब्बीर यांनी सांगितले.
--
कोविड केअर सेंटरवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याची मागणी मागणी आहे. किमानपक्षी तूर्तास एनआरएएममध्ये तरी समाविष्ट केले जावे, अशी आमची मागणी आहे. यासाठी आमचा लढा सुरू आहे.
-अमोल गवई, जिल्हाध्यक्ष
--
कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत कायमस्वरूपी समावून घ्यावे, अशी आमची प्रमुख मागणी असून, या मागणीसाठी आम्ही आंदोलनात्मक भूमिकाही घेतली होती. दरम्यान, विमा संरक्षण व संबंधित सुविधा न मिळाल्यास प्रसंगी आम्ही कामबंद आंदोलनही करू.
-शेख जहीर शेख शब्बीर, कोविड योद्धा कर्मचारी परिषद, अभियान प्रमुख
----
मलेरियाच्या साथी दरम्यान ९० दिवसांसाठी कर्मचाऱ्यांना घेण्यात आले होते. नंतर सरकारने त्यांना पुढील सर्व भरतीप्रक्रियेमध्ये ५० टक्के आरक्षण देऊन सेवेत कायम केले होते. त्याच पद्धतीने कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावी, अशी मागणीही या कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
--
कंत्राटी कर्मचारी- ६३७
बाधित निघालेले कर्मचारी : १२७