कोरोना काळात प्रशासनाला सहकार्य करा: शिंगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:36 AM2021-04-09T04:36:18+5:302021-04-09T04:36:18+5:30
ते ७ एप्रिल रोजी देऊळगाव राजा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत हाेते. सिंदखेड राजा मतदारसंघातील विकास आराखड्याबाबत डॉ. शिंगणे ...
ते ७ एप्रिल रोजी देऊळगाव राजा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत हाेते. सिंदखेड राजा मतदारसंघातील विकास आराखड्याबाबत डॉ. शिंगणे यांनी माहिती दिली. यामध्ये देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, देऊळगाव मही येथील रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी, अद्यावतीकरणासाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्याप्रमाणे काम पूर्ण झाले असल्याचे शिंगणे यांनी स्पष्ट केले. दिव्यांग महिला व कुटुंबीय सदस्यांकरिता इलेक्ट्रिकल ट्रायसिकल व स्वयंरोजगारासाठी फिरते विक्री केंद्र योजनेअंतर्गत १६५ लाभार्थ्यांसाठी एक कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. याचबरोबर भरतीपूर्व प्रशिक्षण जिल्ह्यातील ५५ मोठ्या ग्रामपंचायतीमधील नव युवकांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण ग्रामपंचायत स्तरावर मिळण्यासाठी २८० लक्ष इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील पोलीस दलातील अद्ययावत व वाहन खरेदीसाठी दीड कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये टेलीमेडिसीन सुविधा उपलब्ध करण्यासाठी तीन कोटी ३० लक्ष रुपयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी असल्याची माहिती डॉ. शिंगणे यांनी दिली. वीज बिलाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकरी यांच्या विजबिला संदर्भामध्ये योग्य तो निर्णय घेण्यासाठी मागणी करणार असल्याचे शिंगणे यांनी सांगितले. कोविड लस व औषधे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करून सर्वसामान्यांना कोविड लस उपलब्ध करून देणे ही माझी नैतिक जबाबदारी असून मी त्याबाबत प्रयत्नशील आहे. उद्योग व्यवसाय व व्यापार याबाबत शासनाचे कुठल्याही प्रकारचे विरोधात धोरण नसून नागरिकांनी गर्दी कमी करून फिजिकल डिस्टन्स पाळावे, मास्क वापरून वेळोवेळी साबणाने हात धुवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.