काँग्रेसचा बँक ऑफ महाराष्ट्र शाखाधिकार्‍यास घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 11:43 PM2017-08-03T23:43:55+5:302017-08-03T23:46:07+5:30

चिखली : शासनाने कर्जमाफी योजनेचा लाभ म्हणून जाहीर केलेली १0 हजार रूपयांची मदत शेतकर्‍यांना तातडीने देण्यात यावी, यासाठी बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी व शेतकर्‍यांनी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखाधिकार्‍यांना २ ऑगस्ट रोजी घेराव घातला होता.

Coordination of Bank of Maharashtra branch of Congress | काँग्रेसचा बँक ऑफ महाराष्ट्र शाखाधिकार्‍यास घेराव

काँग्रेसचा बँक ऑफ महाराष्ट्र शाखाधिकार्‍यास घेराव

Next
ठळक मुद्देकर्जमाफी योजना 

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : शासनाने कर्जमाफी योजनेचा लाभ म्हणून जाहीर केलेली १0 हजार रूपयांची मदत शेतकर्‍यांना तातडीने देण्यात यावी, यासाठी बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी व शेतकर्‍यांनी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखाधिकार्‍यांना २ ऑगस्ट रोजी घेराव घातला होता.
तालुक्यातील पांढरदेव, उत्रादा, दहिगांव, शेलगांव जहागीर या गावातील कर्जमाफीस पात्र असणार्‍या शेतकर्‍यांनी तातडीने १0 हजार रूपये मदत मिळवून द्यावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या नेतृत्वात बॅंकेत धडक देत बॅंक ऑफ महाराष्ट्रचे चिखली शाखेतील कामकाज काही काळासाठी रोखून धरले. दरम्यान डॉ.भुसारी यांनी शाखाधिकारी आसेगांवकर यांच्याशी याबाबत चर्चा केली असता वरीष्ठांशी चर्चा करून पात्र लाभार्थ्यांंना तातडीने लाभ मिळून देण्याचे आश्‍वासन आसेगावकर यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी डॉ. सत्येंद्र भुसारी, ज्ञानेश्‍वर सुरूसे, शिवनारायण म्हस्के, भारत म्हस्के, राजु वाघमारे, समाधान गिते, ईश्‍वर इंगळे, यांच्यासह कडुबा म्हस्के, शंकरराव म्हस्के, अशोक म्हस्के, गणेश म्हस्के, अरूण म्हस्के, नंदकिशोर म्हस्के, किशोर आंभोरे, किसन आंभोरे, कैलास रसाळ, सतिश काळे, प्रल्हाद पाटील, तेजराव साळवे, शाम पंडागळे, भिकनराव ठेंग, संदिप ठेंग, यांच्यासह पांढरदेव, उत्रादा शेलगांव जाहागीर, दहिगांव येथील शेतकरी उपस्थित होते. 
 
Web Title: Coordination of Bank of Maharashtra branch of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.