शौचालय न बांधणा-यांवर गुन्हे दाखल करणार !
By admin | Published: March 10, 2017 01:46 AM2017-03-10T01:46:16+5:302017-03-10T01:46:16+5:30
मोताळा नगर पंचायतचा निर्णय; शौचालय बांधण्याचे न.प. मुख्याधिका-याचे आवाहन.
मोताळा, दि. ९- स्थानिक नगर पंचायतमार्फत स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी लाभार्थींना शौचालय बांधकामासाठी अनुदान दिल्या जात आहे. या अनुदानाचा गैरवापर करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा नगर पंचायत प्रशासनाने दिला आहे. शहरात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. या अभियानांतर्गत लाभार्थी कुटुंबांना शौचालय बांधकाम करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. नगरपंचायतमार्फत शहरातील लाभार्थी कुटुंबांना अनुदानाच्या प्रथम हफ्ता वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जे लाभार्थी अनुदान घेऊनसुद्धा शौचालय बांधकाम करणार नाहीत, अशा लाभार्थींवर शासकीय अनुदानाचा गैरवापर केल्याबद्दल नगर पंचायततर्फे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे अनुदानाचा लाभ घेणार्या लाभार्थींनी शौचालय बांधकाम करून त्याचा वापर करावा, असे आवाहन न.पं.चे मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी केले आहे.