कोरोना : जिल्ह्यात २२७ सक्रिय रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:23 AM2021-01-01T04:23:40+5:302021-01-01T04:23:40+5:30
दुसरीकडे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५१५ जणांचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी ...
दुसरीकडे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५१५ जणांचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी ४८३ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ३२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पिंपळगाव देवी एक, देऊळगाव राजा आठ, वडजी तीन, टुनकी एक, पातुर्डा एक, शेगाव दोन, खातखेड दोन, पिंप्री अढाव एक, खामगाव तीन, गोंधनापूर एक, गारडगाव एक, बुलडाणा पाच, शिरपूर एक, सागवन एक, ढासाळा येथील एकाचा समावेश आहे. गुरुवारी ३१ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये चिखली कोविड केअर सेंटरमधून ११ आणि बुलडाण्यातील २० जणांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ८९ हजार २२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर १२ हजार १४० जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. अद्यापही १,६८६ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या १२ हजार ५१८वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यात २२७ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे १५१ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.