कोरोना : जिल्ह्यात ३६७ सक्रिय रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:32 AM2021-02-07T04:32:20+5:302021-02-07T04:32:20+5:30
शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मोताळा येथील २, साखरखेर्डा येथील ४, शेंदुर्जन येथील १, सिंदखेड राजा येथील १, सिंदखेड ...
शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मोताळा येथील २, साखरखेर्डा येथील ४, शेंदुर्जन येथील १, सिंदखेड राजा येथील १, सिंदखेड मातला येथील १, गिरडा १, म्हसला १, बुलडाणा ११, नांदुरा १, पोटळी १, खैरा १, चिखली ६, केळवद ३, मालगणी १, भालगाव १, इसोली १, धोत्रा भनगोजी १, देऊळगाव राजा ७, सिनगाव जहाँगीर १, बोथा १, शेगाव १, सांगवा १, पहुरपुर्णा २, सोनाळा १, पळशी १, पिंप्री देशमुख १, खामगाव शहर ४, मलकापूर १, उमाळी १ आणि अैारंगाबाद येथील एकाचा यात समावेश आहे. तसेच ४७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. यामध्ये चिखली कोविड केअर सेंटरमधून ३, देऊळगाव राजा १, खामगाव ५, बुलडाणा १३, नांदुरा ३, शेगाव ९, जळगाव जामोद २, मेहकर ४ आणि सि. राजा येथील एकाचा समावेश आहे. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १ लाख १२ हजार १५५ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, एकूण कोरानाबाधितांपैकी १३ हजार ७३६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अद्यापही ९०८ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४,२७४ झाली असून त्यापैकी ३६७ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, आतापर्यंत १७१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.
तसेच आजपर्यंत १७१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.