कोरोना: जिल्ह्यात ४३ जण पॉझिटिव्ह, ४५ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:27 AM2020-12-25T04:27:59+5:302020-12-25T04:27:59+5:30
गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा सात, शेगाव १३, खामगाव ५, चिखली एक, शिंदी हराळी एक, पातुर्डा खुर्द एक, मलकापूर तीन, ...
गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा सात, शेगाव १३, खामगाव ५, चिखली एक, शिंदी हराळी एक, पातुर्डा खुर्द एक, मलकापूर तीन, मोताला एक, दाभाडी एक, नांदुरा दोन, खैरा एक, गोत्रा एक याप्रमाणे बाधितांचा समावेश आहे. दुसरीकडे ४५ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामध्ये बुलडाणा ११, जळगाव जामोद तीन, मेहकर एक, शेगाव दोन, सिंदखेड राजा चार, नांदुरा सहा, देऊळगाव राजा दोन, खामगाव १२, चिखली सात याप्रमाणे कोविड केअर सेंटरमधून बरे झालेल्यांना सुटी देण्यात आली. तसेच आज ४५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.
आतापर्यंत ८६ हजार ६७० संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर ११ हजार ८१६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या १,१६७ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १२ हजार ३०९ झाली आहे. ३४५ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.