कोरोना : जिल्ह्यात ५९ जण कोरोना पॉझिटिव्ह, सक्रिय रुग्णांची संख्या ३८४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:36 AM2021-02-11T04:36:49+5:302021-02-11T04:36:49+5:30

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये सिंदखेड राजा ४, शेंदुर्जन २, मलकापूर पाग्रा २, तांबाेळा २, धानोरा १, किन्ही ३, हत्ता १, ...

Corona: 59 corona positive, 384 active patients in the district | कोरोना : जिल्ह्यात ५९ जण कोरोना पॉझिटिव्ह, सक्रिय रुग्णांची संख्या ३८४

कोरोना : जिल्ह्यात ५९ जण कोरोना पॉझिटिव्ह, सक्रिय रुग्णांची संख्या ३८४

Next

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये सिंदखेड राजा ४, शेंदुर्जन २, मलकापूर पाग्रा २, तांबाेळा २, धानोरा १, किन्ही ३, हत्ता १, पाटोदा १, लोणार १, चिखली ६, देऊळगाव राजा ८, लिंबा १, शेगाव १, खामगाव ३, घाटपुरी २, कदामापूर १, मलकापूर ५, बेलाड १, मोताळा २, बुलडाणा ८, सुंदरखेड १, रायपूर १, सागवन १ तसेच वाडीमधील एकाचा समावेश आहे.

दुसरीकडे २२ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये लोणार २, संग्रामपूर १, बुलडाणा ८, नांदुरा १, चिखली ८, ज. जामोद १, मेहकर १ याप्रमाणे कोरोनामुक्त झालेल्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

१,१३,६५६ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह

आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १ लाख १४ हजार ६५६ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच कोरोनाबाधितांपैकी १३ हजार ९१३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अद्याप १,०९४ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ४७० झाली आहे. यापैकी प्रत्यक्षात ३८४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात १७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.

Web Title: Corona: 59 corona positive, 384 active patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.