कोरोना : ८८१ जणांचे अहवाल निगेटिव्ह, ३० जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:34 AM2021-01-03T04:34:19+5:302021-01-03T04:34:19+5:30
शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा दोन, नांदुरा एक, शेंबा खु. एक, खामगाव तीन, चिखली तीन, वळती दोन, चांधई एक, ...
शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा दोन, नांदुरा एक, शेंबा खु. एक, खामगाव तीन, चिखली तीन, वळती दोन, चांधई एक, वैरागड एक, सवणा एक, अंत्री खेडेकर एक, अमडापूर एक, ईसोली दोन, देऊळगाव राजा दोन, रोहीणखेड एक, पिंपळपाटी एक, थळ एक, पिंपळगाव देवी चार, पिंपळनेर एक याप्रमाणे समावेश आहे. दुसरीकडे ३८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामध्ये खामगाव कोविड सेंटरमधून ११, सिंदखेड राजामधून चार, चिखलीतून तीन, बुलडाणा येथून नऊ, शेगाव एक, नांदुरा दोन आणि देऊळगाव राजा येथील आठ जणांचा समावेश आहे.
आजपर्यंत प्राप्त अहवालांपैकी ९० हजार ६८४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, त्याचप्रमाणे १२ हजार २१५ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
१ हजार २५५ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा
तपासणीसाठी घेण्यात आलेल्या १ हजार २५५ संदिग्धांच्या नमुन्याच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ६१० झाली आहे, त्यापैकी सध्या प्रत्यक्षात २४३ सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. सोबतच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १५२ जणांचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.