कोरोना: ९ जणांचा मृत्यू, ९५७ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:36 AM2021-05-09T04:36:33+5:302021-05-09T04:36:33+5:30
दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५,१४१ जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. ...
दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५,१४१ जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यापैकी ४,१८४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात १११, खामगावमध्ये १४०, शेगावमध्ये ७२, देऊळगाव राजामध्ये १३३, चिखलीमध्ये २४, मेहकरमध्ये १२०, मलकापूरमध्ये ७०, नांदुऱ्यामध्ये ५१, लोणारमध्ये ५०, मोताळ्यामध्ये ४५, जळगाव जामोदमध्ये ६२, सिंदखेड राजा शहरात ७५, संग्रामपूर तालुक्यातील चार जणांचा यामध्ये समावेश आहे.
उपचारादरम्यान मलकापूर तालुक्यातील कुलमखेड येथील ७० वर्षीय व्यक्ती, देऊळगाव राजा येथील दुर्गापुरा भागातील ४४ वर्षीय महिला, देऊळगाव राजा शहरातीलच ७४ वर्षीय पुरुष, सरंबा येथील ६९ वर्षीय पुरुष, मलकापूर तालुक्यातील उमाळी येथील ७० वर्षीय महिला, देऊळगाव मही येथील ६० वर्षीय पुरुष, चिखली येथील ७५ वर्षीय महिला, शेगाव तालुक्यातील कोद्री येथील ६७ वर्षीय महिला आणि नांदुरा येथील ६० वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.
दुसरीकडे १,२०८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ३ लाख ८३ हजार २८७ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. सोबतच ६५ हजार २४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
--६३१० संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा--
तपासणीसाठी घेण्यात आलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैकी ६,३१० जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ७० हजार ९०४ झाली असून, यापैकी ५,१९४ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ४६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.