मेहकर शहरात करवसूलीसह 'कोरोना' जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 12:16 PM2020-03-21T12:16:27+5:302020-03-21T12:16:37+5:30

पालिका कर्मचारी करवसुलीसोबतच कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसून येत आहेत.

 'Corona' awareness with tax collection in Mehkar city | मेहकर शहरात करवसूलीसह 'कोरोना' जनजागृती

मेहकर शहरात करवसूलीसह 'कोरोना' जनजागृती

Next

- ओमप्रकाश देवकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: नगर पालिकेकडून १०० टक्के करवसूलीसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. सध्या कोरोनाची भीती नागरिकांमध्ये असल्याने पालिका कर्मचारी करवसुलीसोबतच कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसून येत आहेत.
मेहकर नगरपालिका कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध कर वसुलीचे काम सुरू केले आहे. यातच कोरोना चे सावट देशभर पसरले असून, कोरोनाला नागरिकांनी घाबरून न जाता नागरिकांनी स्वच्छतेसह इतर काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिका कर्मचारी जनजागृती करीत आहेत.मेहकर नगरपालिकेची आजपर्यंतचा मालमत्ता कर एक कोटी ८८ लाख ८९ हजार ९९० रुपये तर पाणी कर एक कोटी २४ लाख ९१ हजार ३०२ रुपये असे एकूण तीन कोटी १३ लाख ८१ हजार २९२ रुपये कर आहे. या करवसुलीसाठी नगरपालिकेचे कर विभागातील २१ कर्मचारी त्याचप्रमाणे नगरपालिकेतील इतर विभागातील कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. १०० टक्के वसुलीसाठी कर्मचाऱ्यांची धावपळ होत आहे. सध्या देशभरात कोरोणाची दहशत निर्माण झाली असून, यामध्ये शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता स्वच्छता ठेवावी, यासोबतच खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करावा, अनावश्यक ठिकाणी गर्दी करणे टाळावे यासारखे अनेक संदेश नगरपालिकेचे कर्मचारी नागरिकांना देत असून कर वसुली करीत आहे.


१०० टक्के कर वसूली आवश्यक असून त्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे. त्याचबरोबर कोरोना विषयी अफवांवर विश्वास न ठेवता नगरपालिकेचे कर्मचारी करीत असलेल्या मार्गदर्शनानुसार त्याची अंमलबजावणी करावी.
- सचिन गाडे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, मेहकर.

Web Title:  'Corona' awareness with tax collection in Mehkar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.