कोरोना संसर्गकाळात औषध व्यवस्थापन बनली तारेवरची कसरत : चोपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:26 AM2021-04-29T04:26:11+5:302021-04-29T04:26:11+5:30

कोरोना संसर्गाच्या लाटेत औषधांची उपलब्धता कमी आहे. मात्र आरोग्यसेवेतील साडेतीन दशकाचा अनुभव व त्यातून निर्माण झालेेल्या संबंधांच्या आधारावर बुलडाणा ...

Corona became drug management during the infection | कोरोना संसर्गकाळात औषध व्यवस्थापन बनली तारेवरची कसरत : चोपडे

कोरोना संसर्गकाळात औषध व्यवस्थापन बनली तारेवरची कसरत : चोपडे

Next

कोरोना संसर्गाच्या लाटेत औषधांची उपलब्धता कमी आहे. मात्र आरोग्यसेवेतील साडेतीन दशकाचा अनुभव व त्यातून निर्माण झालेेल्या संबंधांच्या आधारावर बुलडाणा जिल्ह्याला गरजेनुरूप औषधीसाठा उपलब्ध करण्यास आजपर्यंत तरी आपण यशस्वी झालो आहोत.

कोरोनाकाळात औषध खरेदी प्रक्रिया काहीशी किचकट झाली आहे का?

प्रक्रिया तशी किचकट नाही. मात्र तांत्रिक समितीसमोर गरज असलेली औषधी, साहित्य आणि रोज लागणारी नवनवीन औषधींची मागणी पाहता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समितीची मान्यता घ्यावी लागते. त्यानंतर दरकरार, टेंडर आणि जिल्हा नियोजन समितीची मान्यता या सर्व प्रक्रियेला ४५ दिवस लागतात. तोवर ग्रॅण्ड उपलब्धतेची समस्या निर्माण होते. ती उपलब्ध झाल्यास पुरवठादाराकडून अग्रीम रकमेची मागणी होती. ही सर्व प्रक्रिया मोठ्या जिकिरीने पार पाडावी लागते.

सध्या आपल्याकडे औषधीसाठा उपलब्ध आहे का?

आपल्याकडे औषधींचा तुटवडा नाही. रेमडेसिविर इंजेक्शनही शासकीय रुग्णालयात गरजेनुरूप उपलब्ध आहेत. फॅबिपीरावीर टॅबलेटचीही अडचण नाही. उलटपक्षी जळगावसह अकोला जिल्ह्याला आपत्कालीन स्थितीत आपण मदत केली आहे. रॅपिट किट, आरटीपीसीआर किट आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

या धामधुमीत कुटुंबाला कितपत वेळ देता?

कोरोना संसर्गाच्या काळात गेली १५ महिने एक प्रकारे क्वाॅरण्टीनमध्येच जगावे लागत आहे. घरी गेलो तरी मुलांना जवळ घेता येत नाही. दिवसातील बहुतांश वेळ औषधांची जुळवाजुळव करण्यातच जातो. त्यातच दोन सहकारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी येथे मदतीला आहे. परंतु उपलब्ध मनुष्यबळ हे गरजेपेक्षा खूपच कमी आहे.

कोरोनावगळता अन्य औषधींबाबतचा पुरवठा कसा आहे?

कोराेना अैाषधीव्यतिरिक्त अन्य औषधांचा पुरवठा जिल्ह्यात सुरळीत आहे. उलटपक्षी हापकीनकडून कोरोनासंदर्भातील औषधी तुलनेने कमी मिळत असून, सध्या गरज नसलेल्या औैषधींचा पुरवठा अधिक होत असल्याचे चित्र आहे.

आपल्या कामाबद्दल आपण समाधानी आहात का?

गेली १५ महिने फार धामधुमीची गेली. आजही तीच स्थिती आहे. परंतु या संकटाच्या काळात जिल्ह्यासाठी औषध, सिलिंडर व अन्य साहित्य उपलब्ध करण्यात आपण यशस्वी झाले. याचे समाधान आहे. प्रामाणिकपणे काम केले. पण कधी कधी काम करताना काहीजणांकडून अकारण त्रासही झाला. मात्र आपल्या कामाबाबत आपण समाधानी आहोत.

Web Title: Corona became drug management during the infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.