Corona Cases : बुलडाणा जिल्ह्यात  बुधवारी ९ जणांचा मृत्यू, ६६२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 11:47 AM2021-04-29T11:47:05+5:302021-04-29T11:47:13+5:30

Corona Cases: कोरोनामुळे बुधवारी ९ जणांचा मृत्यू झाला असून, ६६२ जणांनी कोरोनावर मात केली.

Corona Cases: 9 killed, 662 positive in Buldana district on Wednesday | Corona Cases : बुलडाणा जिल्ह्यात  बुधवारी ९ जणांचा मृत्यू, ६६२ पॉझिटिव्ह

Corona Cases : बुलडाणा जिल्ह्यात  बुधवारी ९ जणांचा मृत्यू, ६६२ पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनामुळे बुधवारी ९ जणांचा मृत्यू झाला असून, ६६२ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी  पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५००६ जणांचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यापैकी ४,३४४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यात १०३, खामगाव ५२, शेगाव २६, देऊळगाव राजा २८, चिखली ८१, मेहकर १०, मलकापूर ६२, नांदुरा १०२, लोणार ३०, मोताळा ५३, जळगाव जामोद ५०, सि. राजा ४३, संग्रामपूर तालुक्यातील २२ जणांचा समावेश आहे. उपचारादरम्यान बुधवारी जिल्ह्यात ९ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये बुलडाणा येथील ३८ वर्षीय व्यक्ती आणि बुलडाणा शहरातीलच  ५० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. सोबतच देऊळघाट येथील ५५ वर्षीय व्यक्ती, जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील ५० वर्षीय व्यक्ती, नांदुरा तालुक्यातील खातखेड येथील ४८ वर्षीय व्यक्ती, चिखलीमधील राजा टॉवर परिसरातील ८३ वर्षीय व्यक्ती, बुलडाणा तालुक्यातील गुम्मी येथील ५० वर्षीय व्यक्ती आणि जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील ८६ वर्षीय व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे.

Web Title: Corona Cases: 9 killed, 662 positive in Buldana district on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.