Corona Cases in Buldhana: ११ जणांचा मृत्यू, ११०३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 09:50 AM2021-05-08T09:50:37+5:302021-05-08T09:50:49+5:30
Corona Cases in Buldhana: शुक्रवारी जिल्ह्यात ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५,६२४ जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. त्यापैकी ११०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, ४,५२१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यात ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ३३३, खामगाव ४५, शेगाव ५, देऊळगाव राजा २४, चिखली १४१, मेहकर ११७, मलकापूर ५३, नांदुरा ८५, लोणार ६६, मोताळा १०३, जळगाव जामोद ७२, सिंदखेड राजा ५९ या प्रमाणे संदिग्ध कोरोना बाधित आढळून आले.
उपचारादरम्यान चिखली तालुक्यातील काठोडा येथील ५८ वर्षीय व्यक्ती, शेलगाव देशमुख येथील ५८ वर्षीय व्यक्ती, चिखलीमधील ६० वर्षीय महिला, खामगावातील विवेकानंद नगरमधील ८९ वर्षीय पुरुष, नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ६० वर्षीय महिला, शेकापूर येथील ५८ वर्षीय व्यक्ती, मलकापूर तालुक्यातील कुंड खुर्द येथील ४५ वर्षीय महिला, जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथील ५५ वर्षीय पुरुष, जळगाव खान्देश जिल्ह्यातील ७० वर्षीय पुरुष, मलकापूर येथील ४३ वर्षीय पुरुष आणि चिखली तालुक्यातील चंदनपूर येथील ५१ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
दुसरीकडे १०९६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सोबतच ३ लाख ७९ हजार १०३ संदिग्धांचे अहवाल आजपर्यंत निगेटिव्ह आले आहेत, तसेच आजपर्यंत ६४ हजार ३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारचा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट १९.४६ एवढा होता.