Corona Cases in Buldhana : शनिवारी ५ जणांचा मृत्यू, ८७८ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 11:15 AM2021-05-16T11:15:50+5:302021-05-16T11:15:56+5:30

Corona Cases in Buldhana: जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असून शनिवारी ५ जणांचा मृत्यू झाला.

Corona Cases in Buldhana: 5 killed, 878 positive | Corona Cases in Buldhana : शनिवारी ५ जणांचा मृत्यू, ८७८ जण पॉझिटिव्ह

Corona Cases in Buldhana : शनिवारी ५ जणांचा मृत्यू, ८७८ जण पॉझिटिव्ह

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असून शनिवारी ५ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान ८७८ जण तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी  पाठविलेल्या व रॅपिड ॲंटिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४,८०२ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३,९२४ अहवाल तपासणीत निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात २१२, खामगाव ४१, शेगाव ११०, देऊळगाव राजा ८४, चिखली ३२, मेहकर २१, मलकापूर १३५, नांदुरा ७५, लोणार ५१, मोताळा ६१, जळगाव जामोद ११, सि. राजा ३४, संग्रामपूर तालुक्यातील ११ जणांचा समावेश आहे. उपचार दरम्यान, मेहकर तालुक्यातील मोहना येथील ५१ वर्षीय पुरुष, नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ८३ वर्षीय पुरुष, पलसोडा येथील ६० वर्षीय महिला, मेहकर येथील ४५ वर्षीय महिला आणि खामगाव तालुक्यातील वाकूड येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शनिवारी ७६४ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

Web Title: Corona Cases in Buldhana: 5 killed, 878 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.