Corona Cases in Buldhana : मंगळवारी ६ जणांचा मृत्यू, ८०४ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 10:07 AM2021-05-19T10:07:35+5:302021-05-19T10:09:22+5:30
Corona Cases in Buldhana: सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ८०४ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनामुळे मंगळवारी बुलडाणा जिल्ह्यात सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ८०४ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६,८९१ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले होते. त्यापैकी ६०८७ अहवाल निगेटीव्ह आले होते.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात १०५, खामगाव तालुक्यात ६२, शेगावमध्ये ५, देऊळगाव राजा ८७, चिखली ८०, मेहकर १४६, मलकापूर ३८, नांदुरा ६४, लोणार २७, मोताळा ६९, जळगाव जामोद ३३, सि. राजा ७०, संग्रामपूर तालुक्यातील १८ जणांचा समावेश आहे. उपचारादरम्यान खामगाव तालुक्यातील सुटाळा येथील ६० वर्षीय व्यक्ती, चिखली तालुक्यातील किन्होळा येथील ४२ वर्षीय महिला, बुलडाणा तालुक्यातील तांदुळवाडी येथील ४० वर्षीय पुरुष आणि दुधा येथील ५५ वर्षीय महिला तसेच बुडाणा शहरातील ५३ वर्षीय महिला आणि शिवाजीनगर भागातील ६१ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे ९०३ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ४ लाख २५ हजार ३०३ संदिग्धांचे अहवालही निगेटिव्ह आलले आहेत.