Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्यू, ३५ नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 12:32 PM2021-06-16T12:32:08+5:302021-06-16T12:32:17+5:30

Corona Cases in Buldhana : १४८ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

Corona Cases in Buldhana: Death of one, 35 newly positive | Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्यू, ३५ नव्याने पॉझिटिव्ह

Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्यू, ३५ नव्याने पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा  : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून मंगळवारी केवळ ३५ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ तसेच १४८ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला असून, ३०६५ कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत़   
 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहर ७, बुलडाणा तालुका  पळसखेड भट १, शिरपूर १,  संग्रामपूर तालुका   कुंभारखेड १,    चिखली शहर २,  चिखली तालुका  पिंपळगाव १, सवणा १,  तेल्हारा २, शेलगाव जहागीर २, अंत्री खेडेकर १, मंगरूळ नवघरे २, एकलारा १, करवंड १,  मेहकर तालुका सोनाटी १,   जळगाव जामोद शहर ७, जळगाव जामोद तालुका   आसलगाव १,   लोणार तालुका  बिबी २, पिंप्री खंडारे १ आदींचा समावेश आहे़ तसेच जानेफळ, ता. मेहकर येथील ३९ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.   तसेच आजपर्यंत ५ लाख ३४ हजार ६९५  रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. 
 

Web Title: Corona Cases in Buldhana: Death of one, 35 newly positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.