Corona Cases in  Buldhana : काेराेनाचा चढउतार वाढवताेय जिल्ह्याची धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 11:15 AM2021-06-22T11:15:09+5:302021-06-22T11:16:04+5:30

Corona Cases in Buldhana: बुलडाणा तालुक्यात १६, खामगाव १० आणि संग्रामपूर तालुक्यात २७ नवे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली हाेती.

Corona Cases in Buldhana: Fluction of Corona Cases in Buldhana District | Corona Cases in  Buldhana : काेराेनाचा चढउतार वाढवताेय जिल्ह्याची धाकधूक

Corona Cases in  Buldhana : काेराेनाचा चढउतार वाढवताेय जिल्ह्याची धाकधूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात घसरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यादरम्यान काेराेना रुग्णांमध्ये चढउतार पहायला मिळत आहे. कधी कमी तर कधी जास्त रुग्ण आढळत असल्याने नागरिकांची धाकधूक वाढली आहे. दुसऱ्या लाटेचे राैद्ररूप नागरिकांनी अनुभवले आहे. शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत काेराेनाने कहर केला आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे तसेच अनेकांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यातच काेराेना रुग्णांमध्ये चढउतार हाेत असल्याने धाकधूक वाढली आहे. रविवारी बुलडाणा तालुक्यात १६, खामगाव १० आणि संग्रामपूर तालुक्यात २७ नवे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली हाेती. अनलाॅक प्रक्रियेत नागरिकही नियमांचे पालन करीत नसल्याने संसर्ग वाढण्याचा धाेका कायम आहे.

Web Title: Corona Cases in Buldhana: Fluction of Corona Cases in Buldhana District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.