Corona Cases in Buldhana : साेमवारी ११३५ जणांनी केली काेराेनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 11:52 AM2021-05-04T11:52:07+5:302021-05-04T11:52:15+5:30
Corona Cases in Buldhana: उपचारादरम्यान ८ जणांचा मृत्यू झाला असून आणखी ७२८ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग वाढत असला तरी बरे हाेणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असल्याने दिलासा मिळाला आहे़ साेमवारी जिल्ह्यातील ११३५ जणांनी काेराेनावर मात केली तसेच १२७५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत़. उपचारादरम्यान ८ जणांचा मृत्यू झाला असून आणखी ७२८ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़
पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहर व तालुका १०१, खामगांव शहर व तालुका १०, शेगांव शहर व तालुका ९८, दे. राजा तालुका व शहर : २६७, चिखली शहर व तालुका १०, मेहकर शहर व तालुका ७, मलकापूर शहर व तालुका १, नांदुरा शहर व तालुका ४, लोणार शहर व तालुका ६९, मोताळा शहर व तालुका ७९, जळगांव जामोद शहर व तालुका ५८, सिं. राजा शहर व तालुका २२ आणि संग्रामपूर शहर व तालुक्यातील दाेघांचा समावेश आहे़ त्याचप्रमाणे उपचारादरम्यान केसापूर (ता. बुलडाणा) येथील ३६ वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील ५५ वर्षीय पुरुष, खंडाळा म. (ता. चिखली) येथील ४२ वर्षीय पुरुष, पोरज (ता. खामगाव) येथील ७१ वर्षीय महिला, जळगाव जामोद येथील ५५ वर्षीय पुरुष, राहुड (ता. खामगाव) येथील ८० वर्षीय पुरुष, कुंबेफळ (ता. खामगाव) येथील ८५ वर्षीय पुरुष, निमगाव (ता. नांदुरा) येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.