Corona Cases in Buldhana : आणखी सात जणांचा मृत्यू, ४०४ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 11:00 AM2021-05-11T11:00:55+5:302021-05-11T11:01:47+5:30

Corona Cases in Buldhana: साेमवारी आणखी सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़.

Corona Cases in Buldhana: Seven more killed, 404 positive | Corona Cases in Buldhana : आणखी सात जणांचा मृत्यू, ४०४ पाॅझिटिव्ह

Corona Cases in Buldhana : आणखी सात जणांचा मृत्यू, ४०४ पाॅझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून साेमवारी आणखी सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़.  तसेच ४०४ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़  १०१३ रुग्णांनी काेराेनावर मात केली असून १९८१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत़. 
 उपचारादरम्यान टेंभुर्णे, ता. खामगाव येथील ६८ वर्षीय महिला, आंबोडा ता. नांदुरा येथील ७० वर्षीय पुरुष, सुटाळा बु, ता. खामगाव येथील ५५ वर्षीय महिला, अभय नगर खामगाव येथील ४२ वर्षीय महिला, पारडा ता. लोणार येथील ६० वर्षीय पुरुष, गांधी नगर चिखली येथील ६१ वर्षीय महिला, वरुड ता. बुलडाणा येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पाॅझिटिव्ह   रुग्णांमध्ये बुलडाणा शहर २८, बुलडाणा तालुका  ३०, मोताळा शहर   ७,  मोताळा तालुका  ५२, खामगाव शहर २५,  खामगाव तालुका  ०५,  शेगाव शहर ३६,  शेगाव तालुका  २६,  चिखली शहर ०९ , चिखली तालुका २६,    मलकापूर शहर ११,  ,  दे. राजा शहर ११, सिं. राजा शहर ०१,    मेहकर शहर ३ , मेहकर तालुका ०४,   जळगाव जामोद शहर ८, जळगाव जामोद तालुका १७,   नांदुरा शहर ९,    लोणार शहर ०४, लोणार तालुका ०८ आदींचा समावेश आहे. 

Web Title: Corona Cases in Buldhana: Seven more killed, 404 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.