Corona Cases in Buldhana : आणखी सात जणांचा मृत्यू, ७८९ नव्याने पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 12:04 PM2021-05-05T12:04:29+5:302021-05-05T12:04:34+5:30
Corona Cases in Buldhana: मंगळवारी ८७९ जण बाधित आढळून आले; तर ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बाधितांपेक्षा कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढत असून, मंगळवारी १,१७३ बाधितांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, मंगळवारी ८७९ जण बाधित आढळून आले; तर ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
दुसरीकडे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट कीटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३,५६० संदिग्धांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २२८१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात १२०, खामगाव तालुक्यात १६१, शेगावमध्ये ७०, देऊळगाव राजा ३१, चिखली २८, मेहकर ८०, मलकापूर ६७, नांदुरा ६३, लोणार १०३, मोताळा १११, जळगाव जामोद १५, सिंदखेड राजा २६, संग्रामपूर तालुक्यात ४ जण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले. मंगळवारी उपचारादरम्यान सातजणांना मृत्यू झाला. यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण येथील ७० वर्षीय महिला, बुलडाणा येथील ७१ वर्षीय व्यक्ती, खामगावातील सिंधी कॉलनीमधील ४७ वर्षीय महिला, हिरा नगरमधील ८० वर्षीय व्यक्ती, पाटकपुरा भागातील ४० वर्षीय व्यक्ती आणि खामगाव तालुक्यातील जनुना येथील ३४ वर्षीय व्यक्ती, तर शेगाव तालुक्यातील मोदी नगरमधील ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ११७३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.