Corona cases in Buldhana : सहा जणांचा मृत्यू; ४७८ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 10:56 AM2021-05-26T10:56:25+5:302021-05-26T10:56:31+5:30
Corona cases in Buldhana: सहा जणांचा मृत्यू झाला असून ४७८ जण तपासणीत कोरोना बाधीत आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात मंगळवारी कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला असून ४७८ जण तपासणीत कोरोना बाधीत आढळून आले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ५ हजार २४७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४ हजार ७६९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा तालुक्यात ४९, खामगाव २४, शेगाव २४, देऊळगाव राजा १७, चिखली ६८, मेहकर ५६, मलकापूर ३२, नांदुरा २३, लोणार २१, मोताळा १५, जळगाव जामोद ३१, सिंदखेड राजा १५, संग्रामपूर तालुक्यातील १०३ जणांचा समावेश आहे.दुसरीकडे उपचारादरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील ५४ वर्षीय महिला, खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील ५४ वर्षीय व्यक्ती, सि. राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील ८३ वर्षीय व्यक्ती, बुलडाण्यातील मिर्झानगरमधील ७० वर्षीय वृद्ध, चिखलीतील ७५ वर्षीय महिला आणि नांदुऱ्यातील ७० वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
दुसरीकडे ६१५ जणांनी मंगळवारी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संशयितांपैकी ४ लाख ५६ हजार २९७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.