Corona Cases in Buldhana : तिघांचा मृत्यू, १२८ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 11:13 AM2021-06-02T11:13:34+5:302021-06-02T11:13:42+5:30
Corona Cases in Buldhana: ४०९१ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले, त्यांपैकी तीन हजार ९६३ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनामुळे जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून तपासणीमध्ये १२८ जण कोरोनाबाधित आढळून आले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ४०९१ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. त्यांपैकी तीन हजार ९६३ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील ३५, खामगाव १२, शेगाव दोन, देऊळगाव राजा ११, चिखली ११, मेहकर ९, मलकापूर २, नांदुरा १५, लोणार ७, मोताला ४, जळगाव जामोद २, सिंदखेड राजा १५, आणि संग्रामपूर तालुक्यातील दोघाजणांचा समोश आहे.
दुसरीकडे, उपचारादरम्यान खामगाव तालुक्यातील सुटाळा येथील ५५ वर्षीय महिला, जळगाव-जामोद तालुक्यातील ४२ वर्षीय महिला आणि नांदुरा तालुक्यातील वळती येथील १०० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, ३२० जणांनी मंगळवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ८२ हजार ६६३ कोरोनाबाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.