Corona Cases in Buldhana : तिघांचा मृत्यू, ३० जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 11:40 AM2021-06-14T11:40:37+5:302021-06-14T11:40:47+5:30

Corona Cases in Buldhana: तीन जणांचा रविवारी मृत्यू झाला असून ३० जण तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

Corona Cases in Buldhana: Three killed, 30 positive | Corona Cases in Buldhana : तिघांचा मृत्यू, ३० जण पॉझिटिव्ह

Corona Cases in Buldhana : तिघांचा मृत्यू, ३० जण पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनामुळे तीन जणांचा रविवारी मृत्यू झाला असून ३० जण तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ३ हजार ५१६ जणांचे अहवाल आरोग्य विभागास प्राप्त झाले. त्यापैकी ३ हजार ४८६ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील सहा, खामगाव तीन, देऊळगाव राजा सहा, चिखली पाच, मेहकर दोन, लोणार तीन, जळगाव जामोद एक, सिंदखेड राजा तीन आणि संग्रामपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. दरम्यान शेगाव, नांदुरा आणि मोताळा तालुक्यात तपासणीमध्ये एकही जण कोरोना बाधीत आढळून आलेला नाही. रविवारी एकूण ३० जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. उपचारादरम्यान जळगाव खान्देश मधील वडोदा येथील ६० वर्षीय महिला, चिखली तालुक्यातील शेलगाव आटोळ येथील ४५ वर्षीय व्यक्ती आणि बुलडाणा तालुक्यातील जांभरून येथील ७५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 
दुसरीकडे ८४ जणांनी रविवारी कोरोनावर मात केली. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्यांपैकी ५ लाख २९ हजार ५६७ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ८४ हजार ९९६ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

Web Title: Corona Cases in Buldhana: Three killed, 30 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.