Corona Cases : बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी पाच बळी, ६३० नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 10:50 AM2021-04-01T10:50:25+5:302021-04-01T10:50:38+5:30

CoronaVirus in Buldhana : ३ हजार ९२३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ६३० अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.

Corona Cases: Five more corona victims in Buldana district, 630 new positive | Corona Cases : बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी पाच बळी, ६३० नवे पॉझिटिव्ह

Corona Cases : बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी पाच बळी, ६३० नवे पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४ हजार ५५३ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३ हजार ९२३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ६३० अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. पाच रुग्णांचा बुधवारी काेरोनामुळे मृत्यू झाला आहे.
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३६६ व रॅपीड टेस्टमधील २६४ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३८७ तर रॅपिड टेस्टमधील ३ हजार ५३६ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ३ हजार ९२३ अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

उपचारादरम्यान चिखली तालुक्यातील महीमळ येथील ६५ वर्षीय व ७८ वर्षीय पुरूष, नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ७९ वर्षीय महिला, खामगांव येथील ७४ वर्षीय पुरूष, वालसावंगी (ता. भोकरदन जि. जालना) येथील ६८ वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे आहेत. बुलडाणा शहर ६५, बुलडाणा तालुका : सुंदरखेड २, रायपूर १, डोंगरखंडाळा १, पाडळी २, सागवन ३, येळगाव १, देऊळघाट १, खामगाव शहर ६५, खामगाव तालुका : सजनपुरी ३, पिंपळगावराजा ६, हिंगणा १, पिंप्री कोरडे ४, गणेशपूर १, शिरसगाव देशमुख १, जळका २, राहुड १, पळशी १, आमसरी ३, आडगाव १, टेंभुर्णा १, घाटपुरी ९, पारखेड १, ढोरपगाव २, बोरजवळा १, सुटाळा ७, गोंधनपूर १, शेगाव शहर ८, शेगाव तालुका : गव्हाण १, पहुरजिरा १, जळगाव जामोद शहर ११, जळगाव जामोद तालुका : वडशिंगी ५, काजेगाव ३, सावरगाव १३, खेर्डा बु. ७, रूधाना १, जामोद १, आसलगाव ५, वाडी खुर्द २, पिंपळगाव काळे १, सुलज २, उटी खुर्द ४३, धानोरा १, संग्रामपूर शहर ३, संग्रामपूर तालुका काटेल ८, खिरोडा १, रोहणा १, टुनकी १, पातुर्डा १, वरवट ३, काकडेश्वर १, कोलद १, एकलारा १, सायखेड १, बोरखेड १, बावनबीर १, सगोडा १, सोनाळा ३, उकडगा १, कथरगाव १, मनार्डी १, असोदा १, काकनवाडा १, बोडखा १, वानखेड २, चिखली शहर २१, चिखली तालुका : मंगरूळ नवघरे २, अमडापूर १, सवणा १, एकलारा ३, मुरादपूर १, खैरव १, मालखेड २, गांगलगाव १, चंदनपूर १, शेलगाव आटोळ १, करवंड १, माळविहीर १, मोताळा शहर ४, मोताळा तालुका सांगळद २, रोहीणखेड २, अंत्री १, बोराखेडी ४, पोफळी २, काबरखेड २, कोथळी ४, खरबडी १, आव्हा २, धामणगाव दे. २, परडा ३, शिरवा १, धामणगाव बढे २, शेलापूर ३, पिंप्री गवळी २, मेहकर शहर १२, मेहकर तालुका अंजनी खुर्द १, अंत्री देशमुख १, डोणगाव २, लव्हाळा १, लोणी गवळी १, उकळी १, नांदुरा शहर १०, 
नांदुरा तालुका : निमगाव २, सावरगाव ५, अवधा २, खुमगाव ८, नवीन येरळी १, वडाळी १, धाडी खु १, भोरवट १, पातोंडा १, चांदुर बिस्वा १, खैरा १, टाकरखेड १, मलकापूर शहर २८, मलकापूर तालुका दसरखेड १९, धरणगाव १, कुंड बु. ६, दुधलगाव १, दाताळा १, पिंपळखुटा १, घिर्णी १, नरवेल ५, विवरा २, देऊळगाव राजा शहर ३३, देऊळगाव राजा तालुका : गारखेडा १, असोला जहा १, जांभोरा २, चिंचाली बु. १, सावखेड भोई २, तुळजापूर १, टाकरखेड भागीले १, गिरोली खुर्द १, देवखेड १, दगडवाडी १, निमखेड १, सातेगाव २, मंडपगाव १, नागणगाव १,जळगाव १, दे. मही १, सिंदखेड राजा शहर १०, सिंदखेड राजा तालुका : किनगाव राजा १, पिंपळगाव २, सोयंदेव ४, देवखेड १, सवडत ३, भोसा १, शेंदुर्जन २, आंबेवाडी १, शिवणी १, उगला १, कडपंची १, वाघोरा २, पळसखेड १, मलकापूर पांग्रा १, दुसरबीड ३, हनवतखेड १, शिंदी १, कंडारी १, लोणार शहर १, लोणार तालुका : महारचिकना १, गनपूर १,देऊळगाव कोळ १, पळसखेड जहा. २, वढव २, परजिल्हा अकोला १, कुऱ्हा
(ता. मुक्ताईनगर) १, जाफ्राबाद (जि. जालना) २ संदिग्ध व्यक्ती पॉझीटीव्ह आलक आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात ६३० रूग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत.

Web Title: Corona Cases: Five more corona victims in Buldana district, 630 new positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.