बुलडाण्यात कोरोना नियंत्रणाात; बारा तालुक्यात एकही रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 11:09 AM2021-07-29T11:09:16+5:302021-07-29T11:10:20+5:30

Corona control in buldhana : सध्या केवळ २३ सक्रिय रुग्ण असल्याचे एकंदरीत चित्र आहेत.

Corona control in buldhana; There are no patients in Bara taluka | बुलडाण्यात कोरोना नियंत्रणाात; बारा तालुक्यात एकही रुग्ण नाही

बुलडाण्यात कोरोना नियंत्रणाात; बारा तालुक्यात एकही रुग्ण नाही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: मे-जून महिन्यात महत्तम पातळीवर गेलेले कोरोनाचे संक्रमण आता जिल्ह्यात नियंत्रणात आले असून २८ जुलै रोजी तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांच्या २ हजार ५०५ अहवालांपैकी फक्त एकच अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यातच जिल्ह्यात सध्या केवळ २३ सक्रिय रुग्ण असल्याचे एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे बुधवारचा पॉझिटिव्हिटी रेट अवघा ०.०४ टक्के होता.
एक प्रकारे कोरोना मुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची ही वाटचाल असल्याचे संकेत मिळत आहे. दरम्यान कोरोना बाधितांची संख्या जुलै महिन्याच्या अखेरीस निच्चांकी पातळीवर आल्याने आरोग्य यंत्रणेसाठीही ही बाब हुरूप वाढविणारी आहे. 
दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये चिखली शहरातील डीपी रोडवरील एका व्यक्तीचा समावेश आहे. दरम्यान, आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख ३३ हजार ७६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच ८६ हजार ५५२ कोरोनाबाधितांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. अद्यापही १ हजार ५०४ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ८७ हजार २४७ झाली आहे. यापैकी २३ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 
आजपर्यंत जिल्ह्यात ६७२ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा १२ टक्क्यांच्या आसपास स्थिरावला आहे. येत्या काळात त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

Web Title: Corona control in buldhana; There are no patients in Bara taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.