पोलिसांवर ‘कोरोना’चे संकट; आठवडाभरात ९ पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:05 AM2020-07-27T11:05:14+5:302020-07-27T11:05:31+5:30
आठ दिवसात नऊ पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही क्वारंटीन करण्यात आले आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असतानाच कोरोना विरोधातील लढ्यात ‘फ्रन्ट वॉरियर’ची भूमिका निभावणारे पोलिसही कोरोनाच्या संकटात सापडले आहेत. आठ दिवसात नऊ पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही क्वारंटीन करण्यात आले आहे. दरम्यान, पिंपळगाव राजा व डोणगाव पोलीस स्टेशनच क्वारंटीन करण्याची वेळ आली.
पोलीस दलातील संपूर्ण बंदोबस्त हा कोरोना लढ्यात कोरोना योद्ध्याच्या भूमिकेत असल्याने जिल्ह्यातील जवळपास दोन हजारांवर पोलीस कर्मचारी कोरोना विरोधातील लढ्यात अग्रेसर भूमिका निभावत आहेत. परिणामी कोरोनाचा धोका सर्वप्रथम पोलिसांनाच होता; मात्र गत १२० दिवसात पोलीस कोरोनाच्या प्रादुर्भावापासून सुरक्षित होते; मात्र गत आठ दिवसात पोलीस कर्मचाऱ्यांनाच
कोरोनाची बाधा झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. जिल्ह्यातील पिंपळगाव राजा व डोणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्ती तथा कुटुंबीयांसह जवळपास १०० जणांना क्वारंटीन करण्याची वेळ आली आहे. पिंपळगाव राजा व डोणगाव पोलीस ठाण्यातील जवळपास प्रत्येकी चार पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. २५ जुलै रोजी घेतलेल्या अॅन्टीजेन टेस्टमध्ये डोणगाव पोलीस ठाण्यातील एकूण चार जण पॉझिटिव्ह आले आहेत; मात्र या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे त्यांना क्वारंटीन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या लढ्यात पोलीस दलातील जवळपास दोन हजारांवर कर्मचारी गुंतलेले असल्याने अन्य कामासाठीही तुलनेने मनुष्यबळ उपलब्ध करणे पोलीस प्रशासनास जिकरीचे झाले आहे; मात्र त्या उपरही कोरोनाचा संसर्ग होण्याचा स्त्रोत शोधून काढण्यात बुलडाणा पोलीस अग्रेसर असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी वापरण्यात येणाºया पंचसुत्रीमध्ये तथा प्रतिबंधित क्षेत्राचे सिमांकन करण्यामध्ये पोलिसांची महत्त्वाची आहे.
डोणगाव पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्कातील सर्व कर्मचाºयांची तपासणी करण्यात येत असून, अॅन्टीजेन टेस्ट सोबतच आरटीपीसीआर टेस्टही आम्ही करणार आहोत. कुटुंब प्रमुख म्हणून या कर्मचाºयांच्या आपण संपर्कात आहोत. कोरोना प्रतिबंधाच्या लढ्यात पोलीस अग्रेसर आहेत.
-डॉ. दिलीप पाटील भुजबळ,
जिल्हा पोलीस अधीक्षक बुलडाणा