कोरोनाने मृत्यू, माहिती दडवली; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 10:33 AM2020-05-15T10:33:53+5:302020-05-15T10:34:25+5:30

हे कुटूंब मुळचे नरवेल येथील असून, ते मुंबई येथे वास्तव्यास होते.

Corona death, information hide; Charges filed against six people | कोरोनाने मृत्यू, माहिती दडवली; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कोरोनाने मृत्यू, माहिती दडवली; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नरवेल / मलकापूर : वडीलांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती लपवून ठेवणाऱ्या कुटुंबातील सहा जणांना गुरुवारी बुलडाणा येथे हॉस्पिटल कारंटीन केले. याप्रकरणी मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना बुलडाणा कोविड रुग्णालयात क्वारंटीन करण्यात आले आहे. हे कुटूंब मुळचे नरवेल येथील असून, ते मुंबई येथे वास्तव्यास होते. गावातील सजग नागरिकाने हे वास्तव समोर आणले.
संत मुक्ताबाई चाळ रोड नंबर ३४ वागळे इस्टेट जिल्हा ठाणे येथे वास्तव्य असलेल्या एका इसमाला सर्दी, ताप, खोकला व श्वास घेण्याचा त्रास होत असल्याच्या कारणास्तव कळवा जि. ठाणे येथील रुग्णालयात ७ मे रोजी भरती केले होते. उपचारादरम्यान या रुग्णाचा ९ मे रोजी मृत्यू झाला. मृत्यूनंतर मृतकाच्या मुलाने व कुटुंबातील सदस्यांनी पित्याचा अंत्यविधी घाईघाईने उरकत एका ट्रकद्वारे मलकापूरची वाट धरली. प्रवास सुरू असताना वाटेतच ‘तुमच्या पित्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह’ आल्याची बाब संबंधित रुग्णालय प्रशासनाकडून मृतकाच्या मुलाला भ्रमणध्वनीद्वारे कळविली होती. असे असतानाही ही बाब त्या परिवारातील सदस्यांनी लपवून ठेवत मलकापूर गाठले.
येथे आल्यावर स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून होम क्वारंटीन करवून घेतले. नरवेल येथील एका नागरिकाला वास्तव परिस्थिती कळताच त्याने प्रशासनाला सजग केले.
या बाबीची तत्काळ दखल घेत नरवेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद माळी यांनी गावात जाऊन त्या कुटुंबातील १ पुरुष, ३ महिला तथा २ पाच वर्षीय बालक असे एकूण ६ सदस्यांना ताब्यात घेत बुलडाणा येथे हॉस्पिटल क्वारंटीन केले. या कारवाईमुळे लपवून ठेवलेली वास्तव माहिती उघड झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
 

साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये ‘गुन्हा दाखल’
नरवेल: ९ मे रोजी कळवा जि. ठाणे येथे मृत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले कुटुंबीय १२ मेरोजी ठाण्यावरून नरवेलला आले; परंतु आल्यावर त्यांनी माहिती न दिल्याने म्हैसवाडीचे पोलीस पाटील योगेश मधुकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंविच्या कलम १८८,२६९,२७०,२७१ सह कलम ३ साथीचे रोग प्रतिबंधक कायदा, सन १८९७ सह कलम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ सह कलम कोवीड १९, उपायोजना नियम २०२० नियम ११ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास दसरखेड एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एफ. सी. मिर्झा यांच्या मार्गदर्शनात एएसआय लहू सोनवणे करीत आहेत.

 

Web Title: Corona death, information hide; Charges filed against six people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.