कोरोना : एकाचा मृत्यू, ३०८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:48 AM2021-02-26T04:48:29+5:302021-02-26T04:48:29+5:30

गुरुवारी तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी २,७५३ अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी २,४३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ३०८ जणांचे ...

Corona: Death of one, 308 positive | कोरोना : एकाचा मृत्यू, ३०८ पॉझिटिव्ह

कोरोना : एकाचा मृत्यू, ३०८ पॉझिटिव्ह

Next

गुरुवारी तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी २,७५३ अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी २,४३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ३०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मलकापूर ४६, तांदूळवाडी २, तालसवाडाे १, चिखली ३४, चांधी १, पळसकेड १, अंचरवाडी १, शेलगाव आटोळ १, पळसकेड दौलत १, अमोना १, भोकर २, डोंगरशेवली २, मुरादपूर १, शिंदी हराळी ३, सावरगाव डुकरे २, तेल्हारा १, मंगरूळ नवघरे १, आमखेड १, खैरव १, शेलूद २, शिरपूर २, वळती १, माळशेंबा १, कोलारा ३, टाकरखेड हेलगाव १, दहीगाव १, मेहकर ३, डोणगाव १, सावत्रा ३, हिवरा आश्रम १, शेंदला १, जानेफळ १, बुलडाणा ३७, माळविहीर १, हतेडी १, डोंगरखंडाळा १, सागवन ६, अजिसपूर १, नांदुरा १, खामगाव ४१, शेलोडी १, घाटपुरी १, शेगाव १, जळगाव जामोद २, झाडेगाव १, आसलगाव ११, पिंपळगाव काळे १, सुलज १, वाघोरी वडगाव १, वाकी २, डोढ्रा २, देऊळगाव मही ४, सावंगी टेकाळे २, सिनगाव जहागीर ६, आळंद ३, चिंचोली बुरुकुल २, देऊळगाव राजा १४, सि. राजा ८, सवडत १, पिंपळखुटा २, वाघोरा ३, रोहीर १, सावरगाव माळ १, शेंदुर्जन १, लोणार ३, बोराखेडी ३, पिंपळगाव देवी १, तळणी १, सारोळा मारोती १, खरबडी १, उऱ्हा १, वरूड ३, नागपूर येथील १, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील पिंपरखेड येथील १, भंडारा १, अकोला १, जालना जिल्ह्यातील सांजोळ येथील १ आणि बीडमधील २ संशयितांचा यात समावेश आहे. दरम्यान, बुलडाणा शहरातील गोपाळ आश्रमातील एका ७५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे १३४ जणांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १ लाख २७ हजार ३७२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १५ हजार ०७९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

--७१३१ अहवालांची प्रतीक्षा--

कोरोना चाचण्यांचा वेग वाढविण्यात आला असून अद्यापही ७,१३१ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या जिल्ह्यात १७, ५८८ कोरोनाबाधित असून त्यापैकी २,३१७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १९२ जण मृत्यू पावले आहेत.

Web Title: Corona: Death of one, 308 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.