कोरोनाने मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार करणाऱ्या योद्‌ध्यांचा सत्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:13+5:302021-05-29T04:26:13+5:30

कोरोना महामारीत मागील वर्षीपासून डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आदी आघाडीवर राहून लढत आहेत. त्यांच्यासोबतच कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या ...

Corona felicitates warriors who bury the dead! | कोरोनाने मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार करणाऱ्या योद्‌ध्यांचा सत्कार !

कोरोनाने मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार करणाऱ्या योद्‌ध्यांचा सत्कार !

Next

कोरोना महामारीत मागील वर्षीपासून डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आदी आघाडीवर राहून लढत आहेत. त्यांच्यासोबतच कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करणारे, मृतावर शासनाच्या प्रोटोकॉलनुसार अंत्यविधीसाठी पाठवून त्यांच्यावर त्यांच्या धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र कर्तव्य बजावीत आहेत. याची दखल घेत आ. श्वेता महाले यांनी प्रशांत चौधरी, सतीश काळे, दीपक राजूरकर, रवी बोरकर, मनीष हाडे, लखन मोरे, गजानन केवट या योद्‌ध्यांना किराणा किट्स, चादर आणि टॉवेलचे वितरण करून नि:स्वार्थीपणे बजावत असलेल्या कर्तव्यासाठी प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. विजय कोठारी, सुहास शेटे, सुरेंद्र पांडे, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, कुणाल बोंद्रे, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, न.प. सभापती विजय नकवाल, नगरसेवक गोविंद देव्हडे, संजय आतार, सुभाषअप्पा झगडे, सुनील वायाळ, संतोष काळे पाटील, विजय खरे, युवराज भुसारी, नरेंद्र मोरवाल, महेश लोणकर, सचिन कोकाटे, नचिकेत पांडे, सागर पुरोहित, सुदीप भालेराव, अनिल सपकाळ आदी उपस्थित होते.

Web Title: Corona felicitates warriors who bury the dead!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.