कोरोना वाढला; सॅनिटायझर वापर मात्र घटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:34 AM2021-03-16T04:34:17+5:302021-03-16T04:34:17+5:30

गतवर्षी काेराेना संक्रमण वाढल्याने सॅनिटायझर, साबण व मास्कची विक्री माेठ्या प्रमाणात वाढली हाेती. संसर्ग जगभर पसरत ...

Corona grew; Sanitizer use, however, declined! | कोरोना वाढला; सॅनिटायझर वापर मात्र घटला!

कोरोना वाढला; सॅनिटायझर वापर मात्र घटला!

Next

गतवर्षी काेराेना संक्रमण वाढल्याने सॅनिटायझर, साबण व मास्कची विक्री माेठ्या प्रमाणात वाढली हाेती. संसर्ग जगभर पसरत असल्याने नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण हाेते. या भीतीपाेटी सर्वच नागरिक वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे तसेच मास्क लावणे आदी काेराेनाविषयक नियमांचे पालन करीत हाेते. काेराेनावरील लसीला केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर तसेच प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर बुलडाणा शहरासह जिल्ह्यात काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याविषयी ग्रामस्थ उदासीन असल्याचे दिसले. साधारणत: नाेव्हेंबर,डिसेंबर, जानेवारी या महिन्यांमध्ये नागिरकांनी सॅनिटायझरचा वापर करणे बंदच केले. तसेच अनेकजण मास्कही लावत नसल्याचे चित्र हाेते. मार्च ते सप्टेंबरपर्यंत सॅनिटायरझरची वाढलेली विक्री नाेव्हेंबरमध्ये एकदम कमी झाली. अनेक औषध विक्रेत्यांना सॅनिटायझरच्या बाॅटल परत कराव्या लागल्या, तर काहींनी सॅनिटायझरचा माल बाॅक्समध्ये ठेवून दिला. फेब्रुवारी महिन्यात पुन्हा काेराेना वाढत असल्याने तसेच मार्च महिन्यात माेठ्या प्रमाणात रुग्णात वाढ होत असल्याने नागरिक पुन्हा सॅनिटायझर विकत घेत आहेत. वापर मात्र, अजूनही कमी आहे.

८० टक्के विक्री घटली

मार्च २०२०च्या तुलनेत गत तीन ते चार महिन्यांत सॅनिटायझरची विक्री ८० टक्क्यांनी घटली आहे. आधी औषध विक्रीच्या दुकानात बहुतांश ग्राहक सॅनिटायझरसाठीच येत हाेते. आता मात्र, सॅनिटायझरचा वापर करण्याकडे ग्राहकांचा कल कमी झाला आहे. त्यामुळे, विक्री माेठ्या प्रमाणात घटली आहे. शहरातील औषध विक्रेत्यांना विचारणा केली असता त्यांनी सॅनिटायर परत केल्याचे सांगितले. गत काही दिवसांपासून काेराेना रुग्ण वाढत असल्याने आता काही प्रमाणात सॅनिटायझरची विक्री हाेत आहे.

काेराेना संसर्ग कमी झाल्यानंतर सॅनिटायरझर व साबणाचा वापर कमी केला हाेता. मात्र, आता संसर्ग वाढत असल्याने सॅनिटायझर आणि साबणाचा वापर करीत आहाेत. आराेग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करताे. बाहेरून आल्यानंतर साबणाने हात धुणे आवश्यक आहे.

सुशील जाेशी, धाड

काेराेना रुग्ण वाढत असल्याने सॅनिटायर आणि साबणाचा नियमित वापर करीत आहे. बाहेरून आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुताे. तसेच काेराेनाविषयक नियमांचे पालन करताे.

विजय क्षीरसागर, बुलडाणा

सॅनिटायझरची विक्री गत काही महिन्यांत ८० टक्क्यांनी कमी झाली आहे. मास्कची विक्री मात्र कायम आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सॅनिटायझरचा वापर करण्याकडे नागरिकांचा कल कमी असल्याचे चित्र आहे. काेराेना रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

राजेंद्र नाहर, जिल्हा अध्यक्ष, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, बुलडाणा

Web Title: Corona grew; Sanitizer use, however, declined!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.