बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; ८८ पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 11:14 AM2020-08-04T11:14:48+5:302020-08-04T11:15:09+5:30
जिल्ह्यातील रुग्णसंख्या १४८७ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी आणखी ८८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच ४३९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ३५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या १४८७ वर पोहचली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५२७ अहवाल सोमवारी प्राप्त झाले. यामध्ये ८८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये प्रयोगशाळेतील ५७ व रॅपिड टेस्टमधील ३१ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ११६ तर रॅपिड टेस्टमधील ३२३ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा : एक पुरूष, सरस्वती नगर, एक महिला, एक पुरूष, लांडे ले आऊट एक पुरूष, बाजार समिती परिसर एक महिला, एक पुरूष, सुवर्ण नगर एक पुरूष, संगम चौक परिसर एक महिला, भीमनगर एक पुरूष, जिजामाता नगर एक पुरूष, दत्तपूर ता. बुलडाणा : एक पुरूष, चिखली : दोन पुरूष, एक महिला, जाफ्राबाद रोड दोन महिला, एक पुरूष, सुलतानपूर ता. लोणार : एक महिला, मोताळा : एक पुरूष, एक महिला, मलकापूर : एक महिला, भोगावती ता. चिखली : दोन महिला, दाताळा ता. मलकापूर : दोन पुरूष, दोन महिला, नांदुरा : जामा मस्जिदजवळ दोन महिला, एक पुरूष, विठ्ठल मंदीराजवळ सात महिला, एक पुरूष, मिलींद नगर दोन पुरूष, एक महिला, डवंगेपुरा एक पुरूष, राम मंदीराजवळ दोन महिला, एक पुरूष, वसाडी बु ता. नांदुरा : एक महिला, खामगांव : दोन पुरूष, डि.पी रोड एक महिला, सती फैल पाच महिला, आठवडी बाजार दोन पुरूष, वाडी दोन महिला, एक पुरूष, शेगांव : पोलीस स्टेशन एक पुरूष, माटरगांव ता. शेगांव : पाच पुरूष, तीन महिला, दे. राजा : एक महिला, एक पुरूष, मस्जिदपुरा एक पुरूष, अहिंसा नगर एक पुरूष, बोराखेडी ता. दे. राजा : तीन पुरूष, चार महिला, साखरखेर्डा ता. सिं. राजा : तीन पुरूष, लोणार : एक पुरूष, बावनबीर ता. संग्रामपूर : दोन पुरूष, एक महिला, खरबडी ता. मोताळा : एक पुरूष,एक महिला संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. सोमवारी ३५ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत ९ हजार ९६८ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ८८७ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत ८२ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात रुग्ण संख्या १४८७ वर पोहचली आहे. बुलडाणा शहरासह जिल्ह्यातही कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
८८७ रुग्णांना सुटी
आतापर्यंत जिल्ह्यात ८८७ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ५७० कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ३० कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.