लोणार पर्यटनाला कोरोनाची बाधा; सहा महिन्यापासून पर्यटन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 04:44 PM2020-09-27T16:44:08+5:302020-09-27T16:44:17+5:30
कोरोनामुळे पर्यटन बंद झाल्यामुळे लोणार मधील हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसायही डबघाईस आला आला आहे.
बुलडाणा: कोरोनाची लोणार येथील पर्यटनालाही बाधा झाली आहे. २०२० या वर्षात पहिल्या तीन महिन्यात लोणार येथे दहा हजार पर्यटकांनी भेट दिली होती. त्यानंतर कोरोनामुळे पर्यटन बंद झाल्यामुळे लोणार मधील हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसायही डबघाईस आला आला आहे.
प्रामुख्याने लोणार शहराचे बहुतांश अर्थकारण हे पर्यटकांवर अवलूंून आहे. त्याला हा फटका बसला आहे. कृषी व पर्यटनाला लोणार येथे महत्त्व आहे. विशेष म्हणजे लोणार सरोवरात असलेल्या धार तिर्थावर जाणाºया पर्यटकांची नोंद घेतल्या जात असते. सध्या येथे पर्यटकांना प्रवेश बंदी आहे. मात्र जानेवारी ते मार्च महिन्या दरम्यान येथे प्रतीदिन सरासरी १०० च्या आसपास पर्यटक येत असल्याची नोंद होती. मात्र त्यानंतर पर्यटनाला येथे मोठा फटका बसला.
जून महिन्यात लोणार सरोवराचे पाणी गुलाबी झाल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यासह पर्यटकांनी येथे गर्दी केली होती. हा अपवाद वगळता लोणार सरोवर पाण्यासाठी पर्यटक येण्याचे प्रमाणच आता रोडावल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मिशन बिगीन अगेन अंतर्गत वन पर्यटनास परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी ज्ञानगंगा आणि अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांनी कोरोनाच्या लॉकडाऊनला कंटाळल्यानंतर एकच गर्दी केली होती. त्याचा काय तो थोडाफार फायदा जुन, जुलै मध्ये वन्य जीव विभागाला झाला आहे.
४० वर्षापासून साजरा होतो जागतिक पर्यटन दिन
गेल्या ४० वर्षापासून जागतिक पर्यटन दिन साजरा होता. १९७० मध्ये संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची १९७० मध्ये स्थापना करण्यात आली होती. त्याच्या दहा वर्षानंतर जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यास प्रारंभ झाला. २७ सप्टेंबर १९७० रोजी संयुक्त राष्ट्रसंगाच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना झाल्याने त्या दिवशी १९८० पासून जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो.