श्रमसंस्कार शिबिराला कोरोनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:34 AM2021-04-16T04:34:53+5:302021-04-16T04:34:53+5:30
अमडापूर येथील बसस्थानकाचे काम रखडले अमडापूर : येथील बसस्थानकाचे काम गत काही महिन्यांपासून रखडल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. सध्या ...
अमडापूर येथील बसस्थानकाचे काम रखडले
अमडापूर : येथील बसस्थानकाचे काम गत काही महिन्यांपासून रखडल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. सध्या उन्हाचा पारा चढलेला आहे. त्यामुळे बसस्थानकाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी हाेत आहे.
सुंदरखेड येथे पाणीपुरवठ्याला विलंब
बुलडाणा : सुंदरखेड येथे नागरिकांना विलंबाने पाणीपुरवठा होत आहे. मुबलक जलसाठा असताना, १५ ते २० दिवसांआड नळ सोडण्यात येतात. त्यामुळे नागरिकांना आतापासून कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.
सिमेंट बंधाऱ्यांचे निकृष्ट काम; चाैकशीची गरज
दुसरबीड : जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या वतीने दुसरबीड, बीबी, किनगाव राजा शिवारात झालेल्या सिमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे. या पावसाळ्याच्या दिवसांत अनेक बंधाऱ्यांतून पाण्याची गळती झाली.
वळवाच्या पावसाचा पिकांना तडाखा
लाेणार : तालुक्यातील अनेक गावांमध्ये १४ एप्रिल राेजी वळवाच्या पावसाचा तडाखा बसला़ या पावसामुळे उन्हाळी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़ लाॅकडाउनमुळे अनेक शेतकऱ्यांचा माल पडून आहे़ व्यापारीही कमी दरात शेतमालाची खरेदी करीत असल्याचे चित्र आहे़
घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान रखडले
चिखली : गरिबांना स्वत:चे घर मिळावे यासाठी शासनाने घरकुल योजना सुरू केली आहे. रमाई घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना यांचा समावेश आहे. मात्र घरकूल लाभार्थ्यांची कागदपत्रे व फाईल पूर्ण असूनही अनेकांना अनुदान मिळाले नाही.
शाळाबाह्य मुलांच्या शाेधमाहिमेला काेराेनाची बाधा
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने शाळाबाह्य मुलांची शाेधमाेहीम सुरू हाेऊ शकलेली नाही. शिक्षण विभागाने शाळाबाह्य मुलांची शाेधमाेहीम राबवण्यासाठी नियाेजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
एकाच पावतीवर दिवसभर वाळू उपसा
किनगाव राजा : येथून जवळच असलेल्या हिवरखेड पूर्णा येथील रेतीघाटाचा लिलाव झाला असून, या घाटावरून एका राॅयल्टी पावतीवर दिवसभर वाळूची वाहतूक हाेत असल्याची तक्रार सरपंच व नागरिकांनी तहसीलदार सिंदखेड राजा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
अंगणवाडी केंद्रात गर्भवतींना मार्गदर्शन
सुलतानपूर : वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या काळात स्वत:चे आरोग्य सांभाळून पोषण आहार घेण्याबाबत परिसरातील अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांकडून गर्भवतींना मार्गदर्शन केले जात आहे. सुलतानपूर येथे हा कार्यक्रम पार पडला.
वनजमिनीतून गेलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावा
देऊळगाव राजा: पुणे-नागपूर राष्ट्रीय मार्गावरील दगडवाडी ते असोला जहागीर फाटा हा दोन किलोमीटरचा रस्ता वाहनधारकांना अतिशय धोकादायक बनला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
वीट उत्पादक अडचणीत
बुलडाणा : वीट उत्पादनासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या राखेचे दर गत काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. त्यामुळे वीट उत्पादकांवर संकट कोसळले असल्याने शासनाने राखेचे भाव नियंत्रित करावे, अशी मागणी विनोद दामोदर यांनी निवेदनातून केली आहे.