शाळा प्रवासाच्या निधीला कोरोनाचा फटका - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:36 AM2021-04-09T04:36:01+5:302021-04-09T04:36:01+5:30
प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतिमाह - ३०० रुपये शाळा बंदचा परिणाम यावर्षी कोरोनामुळे शाळा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. जागतिक महामारीचा शिक्षण ...
प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतिमाह -
३०० रुपये
शाळा बंदचा परिणाम
यावर्षी कोरोनामुळे शाळा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. जागतिक महामारीचा शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.
सुरुवातीला ऑनलाइन शाळा सुरू होत्या. त्यानंतर राज्यातील सर्व शाळा अर्थात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारी २०२१
पासून सुरू करण्याचे शासनाचे आदेश होते. त्यामुळे पूर्ण शैक्षणिक वर्षात हे वर्ग केवळ २२ दिवसच सुरू राहिले. त्यामुळे केंद्र
शासनाच्या सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत १० महिन्यांसाठी मिळणारा भत्ता यावर्षी फक्त दोन महिन्याकरिता मिळणार असल्याची माहिती आहे. हा भत्ता पालकांच्या विशेषतः आईच्या बँक खात्यावर जमा करण्याचा शासनाचा निर्णय आहे.
प्रवास भत्ता देण्याची मागणी
शाळा बंद असल्याने अनेक मुलांनी ऑनलाइन अभ्यास केला. तर पाचवी ते आठवीचे वर्ग जवळपास महिनाभर भरले होते. त्यामुळे एक ते दोन महिन्याचा तरी प्रवास भत्ता देण्यात यावा, अशी मागणी पालकांमधून होत आहे. जिल्ह्यात उच्च प्राथमिक शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांच्या गाव वस्त्यापर्यंत एसटी बस पोहचत नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत या अनुदानासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याची मागणी होत आहे.