मलकापूरमध्ये कोरोना संसर्गाचा ‘डाऊनफॉल’ सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:12 AM2020-07-04T11:12:51+5:302020-07-04T11:12:58+5:30
तब्बल ३० टक्के रुग्ण ऐकट्या मलकापूर तालुक्यात सापडत होते ते प्रमाण आता १५ टक्क्यांवर आल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मलकापूर तालुक्यातील कोरोना संसर्गाचा डाऊनफॉल सुरू झाला असून आधी जिल्ह्यातील तब्बल ३० टक्के रुग्ण ऐकट्या मलकापूर तालुक्यात सापडत होते ते प्रमाण आता १५ टक्क्यांवर आल्याचे चित्र आहे.
सध्या तालुक्यात १७ अॅक्टीव कोरोना रुग्ण असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७९ आहे. पैकी ८२ टक्के रुग्ण बरे झाले असल्याचे सुत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्याच्या तुलनेत मलकापूर तालुक्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. परिणामी मधल्या काळात प्रशासकीय पातळीवर पालकमंत्र्यांनी सर्व यंत्रणांची बैठक घेवून काही कडक निर्देश दिल्यानंतर यंत्रणामधील समन्वय वाढला असून त्याचा परिपाक म्हणजे येथील कोरोना ससंर्ग तुर्तास तरी नियंत्रणात आला असल्याचे निदर्शनास येत आहे. २८ जून रोजीची स्थिती पाहता जेथे ११ टक्क्यांच्या आसपास असलेले कोरोना रुग्ण दगावण्याचे प्रमाण आता ८टक्क्यावर आले आहे. हा ही तालुक्याच्या दृष्टीने एक दिलासा म्हणावा लागले.
पोलिस, महसूल, आरोग्य आणि जिल्हा परिषदेच्या सर्व्हेक्षण करणाऱ्या पथकांमधील आपसी समन्वय आता बºयापैकी साधल्या गेला असून हायरिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींवर प्रभावी व त्वरित इलाज करण्यास प्राधान्य दिल्यागेल्यामुळे येथील कोरोना संसर्गाचे प्रमाण हे १५ टक्क्यांनी कमी झाले आहे.
सध्या मलकापूरमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचाही परिणाम यावर झाला असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांनीही दोन दिवसापूर्वी येथे भेट देवून एकंदरीत परिस्थितीची पाहणी केली होती, असे सुत्रांनी सांगितले.
दुसरीकडे येथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले असून कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्काती लोकांचे टेस्टींग वाढविण्यासही प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनीही येथे दोन दिवसापूर्वी भेट देवून एकंदरीत स्थितीची पाहणी केली असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
मृत्यूदर घटला
मलकापूर तालुक्यात जेथे ११ टक्के मृत्युदर होता तो आता ८ टक्क्यांवर आला आहे. सोबतच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अद्यापही एक दोन व्यक्तींना त्रास होत असला तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. तीन जुलै रोजी मलकापूरमधील चार कोरोना बाधीत रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे १२ अॅक्टीव रुग्ण आहेत.