हिवरा गडलिंग येथे कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:34 AM2021-04-18T04:34:13+5:302021-04-18T04:34:13+5:30

संचारबंदी कागदावरच, नागरिकांचा मुक्त संचार बुलडाणा : कोरोनाची साखळी तोडण्याकरिता ‘ब्रेक द चेन’चे निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु गेल्या ...

Corona inspection at Hiwara Gadling | हिवरा गडलिंग येथे कोरोना तपासणी

हिवरा गडलिंग येथे कोरोना तपासणी

googlenewsNext

संचारबंदी कागदावरच, नागरिकांचा मुक्त संचार

बुलडाणा : कोरोनाची साखळी तोडण्याकरिता ‘ब्रेक द चेन’चे निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरामध्ये नागरिकांचा मुक्त संचार होताना दिसून येत आहे. शहरातील बॅंका, शासकीय कार्यालये, भाजीबाजार, फळ विक्रेते आदी ठिकाणी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात मुक्त संचार होताना दिसून येत आहे. पंधरा दिवसांच्या संचारबंदीला पहिल्या दिवशी बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. संचारबंदी असली तरी लोक नोकरी, व्यवसाय, दवाखाना भाजीपाला, धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर मुक्त संचार करताना दिसून येत आहेत. मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

डाॅ. बाबासाहेबांना अभिवादन

बुलडाणा : स्थानिक यशवंत अध्यापक विद्यालय व रामभाऊ लिंगाडे अध्यापक महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. डाॅ. जे. जी. गवई व प्रा. प्रकाश साेनुने यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी प्राचार्य डाॅ. पाटील, प्रा. डाॅ. जे. जी. गवई, प्रा. डी. एल. नरवास, प्रा. जागळेकर, प्रा. आर. आर. खंडेराव, प्रा. वैष्णव, प्रा. उमेश तायडे, याेगेश पाटील आदी उपस्थित हाेते़

माेताळा शहरात घाणीचे साम्राज्य

माेताळा : शहरात एक-एक महिना नाल्यांची साफसफाई होत नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये घाण साचलेली आहे. परिणामी सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या दुर्गंधीयुक्त घाणीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

वन विभागाकडून ४ लाखांची मदत

बुलडाणा : वन्य प्राण्यांकडून पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते. गत दाेन ते तीन वर्षांत पिकांच्या झालेल्या नुकसानीपाेटी शेतकऱ्यांना १ लाख ५१ हजार, तर पाळीव प्राण्यांच्या झालेल्या हानी प्रकरणी २ लाख ९० हजार रुपयांची भरपाई दिली आहे.

पक्ष्यांचे संवर्धन करा!

माेताळा : मागील काही वर्षांपासून निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या चिमण्या नामशेष होत चालल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. त्यामुळे नामशेष होत चाललेल्या पक्ष्यांचे सर्वांनी संवर्धन करावे, असे आवाहन मोताळा वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

बुलडाणा : मार्च महिन्यात जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या वादळी पावसासह गारपिटीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात आले आहेत़ मात्र, अजूनही मदत मिळालेली नाही़

पदाेन्नतीची पदे आरक्षणाच्या नियमानुसार भरा

डाेणगाव : पदाेन्नतीची पदे आरक्षणाच्या नियमानुसार भरण्याची मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

कार्डियाक रुग्णवाहिका मिळाल्याने दिलासा

सिंदखेडराजा : मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख असलेल्या सिंदखेडराजा व देऊळगावराजा या दोन ग्रामीण रुग्णालयासाठी अत्याधुनिक अशा दोन कार्डियाक रुग्णवाहिका १४ एप्रिल रोजी बुधवारपासून रुग्णसेवेत रुजू झाल्या आहेत. त्यामुळे, रुग्णांना दिलासा मिळाला आहे़

बेरोजगारांसाठी नोकर भरती प्रक्रिया राबवा

देऊळगाव राजा : अलीकडील काळात राज्यात रोजगाराच्या संधी कमी झाल्या असून सुशिक्षित बेरोजगारांसाठी समस्या निर्माण होत आहे. राज्य शासनाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासकीय नोकर भरती प्रक्रिया तत्काळ अमलात आणावी अन्यथा मनसे तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे़

अमडापूर येथील मन नदी खाेलीकरणास प्रारंभ

अमडापूर : येथील मन नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामास माझी वसुंधरा अभियानांतर्गत सुरुवात करण्यात आली आहे. अमडापूर येथील मन नदीमध्ये गाळ, गवत व घाणीचे साम्राज्य पसरले होते.

चार गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा

बुलडाणा : जिल्ह्यातील चार गावांमध्ये भीषण निर्माण झाल्यामुळे पाण्याचे टॅंकर मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये माेताळा तालुक्यातील चिंचखेडनाथ व इसालवाडी व चिखली तालुक्यातील तांबूळवाडी व सैलानी नगर या गावांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरावे!

बुलडाणा : बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यासोबत हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिका शेतकऱ्यांनी समजून घ्यावी, असे आवाहन शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत जायभाये यांनी केले आहे.

बसचालक, वाहकांना लसीची प्रतीक्षा

बुलडाणा : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलडाणा जिल्ह्यातील विविध आगारातील चालक व वाहकांना दररोज प्रवाशांच्या गर्दीशी सामना करावा लागत आहे. परंतु त्यांना मागणी करूनही अद्याप काेराेना लस मिळाली नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Corona inspection at Hiwara Gadling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.