कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू, ८७८ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:34 AM2021-05-16T04:34:09+5:302021-05-16T04:34:09+5:30
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात २१२, खामगाव ४१, शेगाव ११०, देऊळगाव राजा ८४, चिखली ३२, मेहकर २१, मलकापूर १३५, नांदुरा ...
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात २१२, खामगाव ४१, शेगाव ११०, देऊळगाव राजा ८४, चिखली ३२, मेहकर २१, मलकापूर १३५, नांदुरा ७५, लोणार ५१, मोताळा ६१, जळगाव जामोद ११, सि. राजा ३४, संग्रामपूर तालुक्यातील ११ जणांचा समावेश आहे. उपचार दरम्यान मेहकर तालुक्यातील मोहना येथील ५१ वर्षीय पुरुष, नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ८३ वर्षीय पुरुष, पलसोडा येथील ६० वर्षीय महिला, मेहकर येथील ४५ वर्षीय महिला आणि खामगाव तालुक्यातील वाकूड येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
दुसरीकडे शनिवारी ७६४ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
--४,११,०८१ अहवाल निगेटिव्ह--
आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ४ लाख ११ हजार ८१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच ७० हजार ७०० बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. शनिवारी २ हजार ८५५ संदिग्धांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ७७ हजार ४४ झाली असून त्यापैकी ५ हजार ८३८ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील ५०६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.